Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना कोरोनाची लागण; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना कोरोनाची लागण; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

Related Story

- Advertisement -

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना ठाण्यातील खासगी (ज्युपिटर) रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. ठाणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना ही कोरोनाची लागण झाली आहे.

गुरुवारी एका महत्वाच्या मिटिंगसाठी डॉ. विपीन शर्मा हे मुंबईला गेले होते. त्यानंतर त्यांना शुक्रवारी त्रास झाल्याने त्यांनी शनिवारी कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र आता तेच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाला आटोक्यात आणण्याची मोठी जबाबदारी पालिका अधिकाऱ्यांवर येऊन पडली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -