Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE ठाणेकरांच्या जीवाशी खेळ; बोगस डॉक्टर पुरविणाऱ्या कंपनीला कोविड रुग्णलयाचे कंत्राट

ठाणेकरांच्या जीवाशी खेळ; बोगस डॉक्टर पुरविणाऱ्या कंपनीला कोविड रुग्णलयाचे कंत्राट

Subscribe

ठाणे महानगरपालिकेच्या बाळकुम येथील कोविड विशेष रुग्णालयात बोगस डॉक्टरांची नियुक्ती झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही या बोगस डॉक्टरांची नियुक्ती करणाऱ्या कंपनीलाच पुन्हा मुदतवाढ देण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप भाजपचे गटनेते संजय वाघुले यांनी केला आहे. ठाण्यातील एका बड्या नेत्याकडून यासंदर्भात महापालिका प्रशासनावर दबाव टाकला जात आहे, असा आरोपही वाघुले यांनी केला.

कोविड रुग्णालयात MBBS इंटर्नशिप पूर्ण नसलेले दोन आणि एक विद्यार्थी असलेल्या डॉक्टरांची नियुक्ती केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या डॉक्टरांकडून आयसीयूमध्ये रुग्णांवर उपचार केले जात होते. त्यामुळे या काळात मृत्युमुखी पडलेल्या काही रुग्णांना बोगस डॉक्टरांमुळे जीव गमवावा लागल्याची भीतीही व्यक्त होत आहे. या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांनी केली आहे.

- Advertisement -

मुंबईतील एका कंपनीला रुग्णालयासाठी नियुक्ती करण्याचा ठेका देण्यात आला होता. या कंपनीकडून प्रशिक्षित व अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नियुक्ती अपेक्षित होती. मात्र, बोगस डॉक्टरांची नियुक्ती केल्याने कंपनीचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. तरीही ठाण्यातील सत्ताधारी एका बड्या नेत्याच्या आशीर्वादातून या कंपनीला पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या प्रस्तावाला भाजपाचा तीव्र विरोध आहे. या कंपनीला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता होती. मात्र, त्यांना पुन्हा रेड कार्पेट टाकले जात आहे, असा आरोप संजय वाघुले यांनी केला. कोणत्याही परिस्थितीत ठाणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांना नाही, असा इशाराही संजय वाघुले यांनी दिला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -