Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE गजबचं! 'sorry पता नही था कोरोना की दवा है.' चोरट्याने चिठ्ठी लिहून...

गजबचं! ‘sorry पता नही था कोरोना की दवा है.’ चोरट्याने चिठ्ठी लिहून केल्या कोरोना लसी परत

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्याने लसीकरण मोहित जलद गतीने राबवली जात आहे. पंरतु अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. अशातच हरियाणा जिंद येथील सरकरी लसीकरण केंद्रात लसींची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. बुधवारी रात्री १२ च्या सुमारास चोरटा कोरोना लसीचे १ हजार ७०० डोस चोरून पसार झाला होता. या घटनेवर साऱ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले. मात्र गुरुवारी या चोरट्याने ‘sorry पता नही था कोरोना की दवा है’ अशा आशयाची एक चिठ्ठी लिहित लसीचे ६२२ डोस परत केले आहेत.

जिंदच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये बुधवारी कोविशिल्ड लसीचे १२७० डोस आणि कोवॅक्सिनचे ४४० डोस चोरी झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाकडून तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला. परंतु याचदरम्यान गुरुवारी चोर सिव्हिन लाईन पोलीस ठाण्यासमोरील चहाच्या दुकानावर प्लास्टिकची बॅग ठेवून पसार झाला. दरम्यान चहा दुकानदाराने ती बॅग घेत पोलीस स्थानकात धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी ती बॅग उघडून पाहिली असता त्यात लसीचे ६२२ डोस आढळून आले. सोबतच बॅगमध्ये एक चिठ्ठीही पोलिसांच्या हाती लागली. त्या चिठ्ठीत चोरट्याने ‘sorry पता नही था कोरोना की दवा है.’ असे लिहिले होते. या घटनेची आता जोरादार चर्चा सुरु झाली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चोरासह उर्वरीत डोसेसचा तपास करत आहेत.

- Advertisement -

चोरलेली ही कोरोना लस जवळपास 12 तासाहून अधिक वेळ शीतगृहाच्या बाहेर राहिल्याने .तिचा वापर करायचा की, नाही असा प्रश्न आता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. यानंतर याबाबत सिव्हिल सर्जन यांनी मुख्यालयाकडे मार्गदर्शक सूचना मागविली आहे.

सिव्हील हॉस्पिटलच्या पीपी सेंटरमध्ये सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोना लसीचे डोस ठेवण्याचे कपाट उघडी असल्याचे दिसून आले. यावेळी कपाडातील १७१० लसीचे डोस फ्रीजरमध्ये ठेवण्यात आलेल्या लसी चोरीला गेल्या उघडकीस आले. विशेष म्हणजे चोराने औषधे चोरली मात्र कपाटात असलेल्या 50 हजारांची रोख रक्कम तशीच होती. परंतु लसीच्या चोरीमुळे रुग्णालयातील साऱ्यांनाच धक्का बसला आहे. याबाबत रुग्णालयाकडून प्रधान वैद्यकीय अधिकारी डॉ. बिमला राठी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -