Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE जागतिक कोरोना अपडेट राज्यात आज २ हजार ४०५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात आज २ हजार ४०५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२४ टक्के झाला एवढा झाला आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात आज २ हजार १०६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण १९ लाख १७ हजार ४५० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा वाढत चालला आहे. कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२४ टक्के झाला एवढा झाला आहे.

महाराष्ट्रात आज एकूण २ हजार ४०५ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्याचा मृत्यूदरही दिवसेंदिवस कमी होत चाचला आहे. आज राज्यात ४७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.५३टक्के इतका झाला आहे.

- Advertisement -

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या कोरोना विषाणूच्या नमुन्यांपैकी १ कोटी ४३ लाख १५ हजार २२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख १३ हजार ३५३ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १ लाख ८४ हजार ९४४ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत. त्याचप्रमाणे २ हजार ६१३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.


हेही वाचा – ‘द लॅन्सेट’ सायन्सनुसार भारत बायोटेकची Covaxin लस सुरक्षित

- Advertisement -

 

- Advertisement -