Homeक्राइमFraud : 18 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा, प्रोजेक्टऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी पैशांचा वापर

Fraud : 18 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा, प्रोजेक्टऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी पैशांचा वापर

Subscribe

अंधेरी आणि भांडुपच्या प्रोजेक्टसाठी दिलेल्या पैशांचा वापर न करता या तिघांनी वैयक्तिक फायद्यासाठी पैशांचा वापर केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

मुंबई : सुमारे 18 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी तीन बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कश्यप कन्हैयालाल मेहता, अतुल शामजी भाराणी आणि पंकज मधुसूदन भुटा अशी या तिघांची नावे आहेत. अंधेरी आणि भांडुपच्या प्रोजेक्टसाठी दिलेल्या पैशांचा वापर न करता या तिघांनी वैयक्तिक फायद्यासाठी पैशांचा वापर केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. यातील तक्रारदार व्यावसायिक असून त्यांचा बांधकामासह फायानान्सचा व्यवसाय आहे. (18 crore fraud case against three use of money for personal gain instead of project in mumbai)

कश्यप मेहता आणि अतुल भाराणी हे तक्रारदारांच्या वडिलांचे परिचित असून त्यांचा स्वतःचा कन्स्ट्रक्टशनचा व्यवसाय आहे. 2004 साली या दोघांनी त्यांच्या दादरच्या एका प्रोजेक्टची माहिती देऊन त्यांना या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक करण्यास सांगितले. तसेच मार्केटमधून काही गुंतवणूकदारांना आर्थिक मदत करण्यास मदत करण्याची विनंती केली होती. या गुंतवणुकीच्या मोबदल्यात त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला. त्यासाठी या दोघांनी त्यांना त्यांच्या सनशाईन ग्रुपच्या विविध कंपनीत वीस टक्के शेअर दिले होते. तसेच त्यांच्या 26 कंन्यामध्ये पार्टनर, शेअर होल्डर आणि संचालक म्हणून नेमणूक केली होती. ही नेमणूक करताना त्यांनी कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी सोपविली नव्हती. त्यानंतर कंपनीने त्यांच्या अंधेरीतील जुहू, भांडुप येथील प्रोजेक्टसाठी एका खाजगी बँकेतून 80 कोटींचे कर्ज घेण्याचा ठराव पास केला होता. हा ठराव नंतर सेक्रेटरी हरेश सोलंकी यांना पाठवून पुढील प्रोसेसिंगसाठी पाठविण्यात आला होता.

याच दरम्यान त्यांना कश्यप मेहता आणि अतुल भाराणी हे त्यांच्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट खरेदी करणार्‍या फ्लॅटधारकाकडून पैसे घेतात, मात्र या पैशांचा प्रोजेक्टमध्ये वापर करत नाही. ही रक्कम ते दोघेही परस्पर अपहार किंवा तिसर्‍या व्यक्तीला देत होते. त्यास त्यांनी विरोध केला होता. या विरोधानंतर त्यांना कंपनीतून बाजूला करण्यात आले होते. बँकेतून घेतलेल्या कर्जावर त्यांनी त्यांना गॅरेटर आणि कर्जदार बनविले होते. कर्जाच्या दस्तावेजावर त्यांची स्वाक्षरी नसताना त्यांची खोटी स्वाक्षरी करण्यात आली होती. 2016 पर्यंत कंपनीने 250 हून अधिक कोटींचे कर्ज घेतले होते. या पैशांचा त्यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला. त्यामुळे त्यांनी संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. इतकेच नव्हे कंपनीच्या तिन्ही आरोपीविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी न्यायालयाने याचिकेवर निकाल लागत नाही तोवर कंपन्याशी कोणतेही व्यवहार करु नये असे आदेश दिले होते.

कंपनीच्या कागदपत्रांच्या पाहणीदरम्यान त्यांना कंपनीने भांडुपच्या प्रोजेक्टसाठी 90 कोटीचे कर्ज घेतले होते. त्यापैकी 43 कोटीचा वापर झाला. मात्र उर्वरित पैशांचा हिशोब नव्हता. तपासात या तिघांनी कर्जाच्या 18 कोटी 22 लाख 55 हजार रुपयांचा प्रोजेक्टमध्ये न वापरता परस्पर अपहार करून फसवणूक केली होती. या आर्थिक गैरव्यवहारामुळै कंपनीच्या अंधेरी आणि भांडुप येथील दोन्ही प्रोजेक्ट बंद पडले होते. कंपनीत दिवाळखोरीत गेली होती. कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड घसरण झाली होती. अशाच प्रकारे त्यांनी कर्ज देणार्‍या कंपनीसह तक्रारदारांची फसवणुक केली होती. याप्रकरणी स्थानिक न्यायालयाच्या आदेशावरुन तिन्ही आरोपीविरुद्ध माटुंगा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर कश्यप मेहता, अतुल भाराणी आणि पंकज भुटा यांच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून 18 कोटी 22 लाखांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.