Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम सासरच्या हुंड्याचा जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, नवऱ्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल

सासरच्या हुंड्याचा जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, नवऱ्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

लग्नात वडिलांनी हुंडा दिला नाही, तुझ्या माहेरहून बाईक घेऊन ये असे म्हणत विवाहितेचा हुंड्यासाठी छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्याविरोधात भोसरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुळ बिहारमध्ये राहणाऱ्या प्रेम चंदेश्वर गिरी यांच्या मुलीचा मनोरंजनकुमार हरेन्द्र भारती या मुलास ७ डिसेंबर २०२० रोजी बिहार येथे विवाह झाला. परंतु लग्नानंतर पंधरा दिवसातच पती मनोरंजनकुमार याने पत्नीला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही. तू हुंडा म्हणून माहेरावरून मोटार सायकल घेऊन येण्यासाठी तिच्या मागे तगादा लावत होता. तसेच पतीसह सासू, सासऱ्यांनी तिचा मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. अनेकदा या विवाहितेला पती जेवायला देत नसत, अशा प्रकारे तिला शारीरिक त्रास दिला जात होता. १७ डिसेंबर २०२० ते २१ एप्रिल २०२१ पर्यंत या विवाहितेचा छळ सुरु होता. मात्र या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने राहत्या घरात ओढणीच्या साह्याने छताच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर विवाहितेच्या वडिलांनी सासरच्या मंडळींविरोधात हुंडाबळीचा गुन्हा नोंदवला आहे.

- Advertisement -

या पीडित विवाहितेचे वडील प्रेम चंदेश्वर गिरी (वय ४२, रा. मठचिलावे, बिहार ) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत मृत विवाहितेच्या वडिलांनी नमूद केले की, यांच्या १९ वर्षीय विवाहित मुलीने हुंड्याच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा पती मनोरंजनकुमार हरेन्द्र भारती (वय २१), सासू कांतीदेवी हरेंद्र भारती (वय ३८), सासरे हरेन्द्रं भुवनेश्वर भारती (वय ४८, सर्व रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी पती मनोरंजनकुमार भारती याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


 

- Advertisement -