Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम वांद्रे बँडस्टँड परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्कार, तीन आरोपींना अटक

वांद्रे बँडस्टँड परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्कार, तीन आरोपींना अटक

Related Story

- Advertisement -

मुंबईतील वांद्रा येथील प्रसिद्ध बँडस्टँड परिसरात एका २० वर्षीय तरुणीवप सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बॉयफ्रेण्डसह त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडित तरुणी आपल्या प्रियकरासोबत बँडस्टँड येथे या समुद्र किनारी फिरण्यासाठी गेली होती, त्यावेळी प्रियकराने आपल्या दोन मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

हे सर्व आरोपी पीडित तरुणीच्या ओळखीचे असल्याची माहिती समोर येत आहे. २० ते २३ या वयोगटात असलेले हे आरोपी मानखुर्द परिसरात राहणारे आहेत. या घटनेनंतर पीडित तरुणी घरी गेल्यानंतर तिच्या अचानक पोटात दुखू लागले. यावेळी तिच्या बहिणीने तिची विचारपूल केली असताना तिने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती उघड केली. त्यानंतर पीडितेच्या बहिणीने दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ मे रोजी वांद्रे पोलिस गाठत सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली.

- Advertisement -

ही तरुणी घरी आल्यानंतर तिने आपल्या पोटात दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तिच्या बहिणीने विचारपूस केल्यानंतर आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार तिने उघड केला. त्यानंतर पीडितेच्या बहिणीने दुसऱ्या दिवशी १२ मे रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात जात सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवली.

सुरुवातीला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता मात्र नंतर वांद्रे पोलीसांकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सदर आरोपींवर अटक सामुहिक बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत. सर्व आरोपींना १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


Cyclone Tauktae: कोकणासह मुंबईतील काही भागात पावसाची हजेरी

- Advertisement -