घरक्राइमYouTube व्हिडिओ पाहून बनवला बॉम्ब, मग डिफ्युज करण्यासाठी गाठले पोलीस स्टेशन

YouTube व्हिडिओ पाहून बनवला बॉम्ब, मग डिफ्युज करण्यासाठी गाठले पोलीस स्टेशन

Subscribe

YouTube Video पाहून आज तरुण वर्ग वेगवेगळ्या कला जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु यावरील काही व्हिडिओंचा गैरवापरही केला जात आहे. मध्यंतरी काही तरुणांनी YouTube Video पाहून घरीतच गांजाची शेती केली होती. अशातच नागपूरमधील एका २५ वर्षीय तरुणाने आता YouTube Video पाहून चक्क एक बॉम्ब (Bomb) बनवला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपी तरुणाने YouTube Video मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्यांची जमवाजमव करत घराच्याघरी हा बॉम्ब तयार केला, परंतु हा बॉम्ब निकामी कसा करायचा हे न समजल्याने बॉम्बचा स्फोट झाल्यास भयानक परिणाम होतील भीतीने तो पूर्ता घाबरला.

यावेळी कसालाही विचार न करता हा बॉम्ब त्याने पिशवीत टाकून थेट नागपूरातील नंदनवन पोलीस स्टेशन गाठले. एखादा खाद्यपदार्थ आणावा तसा बॉम्ब एका पिशवीत टाकून आणला होता. तरुणाचे हे पराक्रम पाहून पोलिसांचीही घाबरगुंडी उडाली. परंतु पोलिसांनी तातडीने बॉम्ब नाशक पथकाला पाचारण करत या पथकाने यशस्वीरित्या बॉम्ब निकामी केला आहे. टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या या बॉम्बचा कधीच स्फोट होणार नव्हता, असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

राहुल पगारे असे या युवकाचे नाव असून त्याने युट्युब व्हिडिओ पाहून बॉम्ब बनवल्याचा गुन्हा मान्य केला आहे. याप्रकरणी राहुलला नंदनवन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नंदनवन पोलिस स्टेशन गाठल्यानंतर राहुलने पोलिसांना सांगितले की, मला एक बॉम्बने भरलेली बॅग केडीके कॉलेजजवळ सापडली. परंतु नंदनवन पोलिस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर यांना राहुलच्य बोलण्यात काहीच तथ्य नसल्याचा संशय आला. त्यानंतर पोलीसी खाक्या दाखवल्यावर राहुलने सत्य पोलिसांना सांगितले. बॉम्बचा स्फोट होण्यापूर्वी आपण पोलिसांच्या ताब्यात द्यावा, जेणेकरुन आपण मोठ्या संकटात अडकणार नाही, असे सत्य राहुलने सांगितले आहे.

त्यानंतर नंदनवन पोलिसांनी बॉम्ब बॉम्ब नाशक पथकाला कळवले. हे पथक पोलिस स्टेशनमध्ये पोहचताच त्यांनी बॉम्ब डिसमेंटल केला. या बॉम्बसाठी राहुलने एका प्लॉस्टिक बॉक्समध्ये फटाक्यांची राख, चायनीज मोबाईल फोन सर्किट, एक ब्लप आणि पेट्रोल ठेवले होते. यासोबतच मच्छर मारण्याचे मशिन आणि खेळण्यातल्या बॅटरीज वापरुन त्यावर रेड लाईट क्रिएट केली होती. याप्रकरणी आरोपी राहुल पगारेविरोधात पोलिसांवनी भादंवि कलम २८५, २८६, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ७,२५(१) (अ), आयपीसी कलम १२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर इंटेलिजन्स एजन्सीज आणि अँटी टेररिस्ट स्कॉड देखील त्याची चौकशी करत आहेत.

- Advertisement -

BDDS च्या तज्ञांनुसार, या बॉम्बमध्ये कोणताही डेटोनेटर किंवा जिलेटीन पदार्थ नव्हता, त्यामुळे या बॉम्बचा कधीच स्फोट झाला नसता. दरम्यान आई-वडीलांच्या मृत्यूमुळे आरोपी राहुल भाड्याच्या घरात एकटाच राहत होता. तो एका सलुनमध्ये काम करत होता. परंतु, लॉकडाऊनंतर उत्पन्नाचे साधन बंद झाल्यामुळे त्याला वारंवार घरं देखील बदलावी लागत होती.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -