घरक्राइमभयंकर! बसमध्ये एक्स गर्लफ्रेंडला ३० हून अधिक वेळा भोसकला चाकू आणि...

भयंकर! बसमध्ये एक्स गर्लफ्रेंडला ३० हून अधिक वेळा भोसकला चाकू आणि…

Subscribe

मेक्सिकोमध्ये गर्दी असलेल्या बसमध्ये एका व्यक्तीने आपल्या एक्स गर्लफ्रेंडवर चाकूने तीसपेक्षा जास्त वेळा वार केले. या हल्ल्यांमुळे ही तरूणी सतत आरडा-ओरड करत होती, परंतु हा हल्ला होत असताना बघून देखील बसमधील प्रवासी या तरूणीच्या मदतीला धावले नाही. तर सर्व लोकांनी पळ काढला. विशेष म्हणजे प्रियकराने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडवर तब्बल ३० हून अधिक वेळा चाकूने वार करून देखील ती तरूणी जीवंत होती.

असा घडला प्रकार

सिनालोआ शहरात झालेल्या या घटनेनंतर तेथील लोक हैराण झाले आहेत. ३३ वर्षीय तरूणीला भेटण्यासाठी तिचा बॉयफ्रेंड पोहोचला. मात्र यावेळी त्याने असं काही केलं की सर्वच थक्क झाले. त्याने आपल्या गर्लफ्रेंण्डवर ३० हून अधिक वेळा चाकूने हल्ला केला. घाबरलेल्या अवस्थेत असलेली तरूणी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आरडा-ओरड करण्यासाठी मदत मागितली. दरम्यान, या भीषण हल्ल्यानंतरही ही तरूणी जिवंत राहली. थंडीचा काळ सुरू असल्याने या तरूणीने थंडीपासून बचाव व्हावा, यासाठी तिने जॅकेट घातले होते. हे जॅकेट घातल्याने तिच्यावर झालेल्या हल्ल्यातून तिचा जीव वाचण्यास मदत झाली.

- Advertisement -

बॉयफ्रेण्ड तिच्यावर हल्ला करून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना बसमधील प्रवासी या तरूणीच्या मदतीस धावले. यावेळी या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. स्थानिक माध्यमांनुसार, जेव्हा या व्यक्तीला अटक केली गेली तेव्हा त्याने स्वत:ला ठार मारण्याचा प्रयत्नही केला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, धक्कादायक हल्ल्यात या महिलेचे हात पाय गंभीरपणे कापले गेले होते. स्थानिक माध्यमांच्या मते, व्हॅलेंटाईन डेच्या काही दिवसानंतर ही घटना घडली होती, परंतु या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. मेक्सिको अटर्नी जनरल अलेजान्ड्रो मनेरो यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांत मेक्सिकोमध्ये महिलांवरील हिंसाचारात लक्षणीय वाढ झाली असून गेल्या पाच वर्षांत महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये १३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -