घरक्राइमधक्कादायक! मुंबईत पित्याने मुलीची हत्या करून घेतला गळफास

धक्कादायक! मुंबईत पित्याने मुलीची हत्या करून घेतला गळफास

Subscribe

मुंबई | एका पित्याने आपल्या ११ वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. यानंतर पित्याने स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. या पित्याचे नाव भूपेश पवार असे नाव आहे, तर मुलीचे नाव आर्या आहे. भूपेश पवार हा सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. भूपेशने मंगळवारी पत्नी कामावर गेली असताना मुलीचा गळा दाबून हत्या केली आणि स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात मुंबईतील काळाचौकी (Kalachowki) पोलीस स्थानकात भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस (Mumbai Police) अधिक तपास करत आहेत.

भूपेश पवार हा शेअर ब्रोकर म्हणून काम करत होता. तर त्यांची पत्नी खासगी कंपनीत डेटा ऑपरेटर म्हणून काम करत होती. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास नेहमी प्रमाणे भूपेशची पत्नी तिच्या कामावर निघून घेली होती. या संधीचा फायदा घेत भूपेशने मुलीची गळा दाबून हत्या केली. दरम्यान, भूपेशच्या पत्नीने त्याला फोन केला होता. परंतु, भूपेशने पत्नीचा फोन उचलला नाही. त्यावेळी पत्नीला संशय आल्यानंतर तिने घराच्या दिशेने धाव घेतली.

- Advertisement -

दरम्यान, भूपेशची पत्नी घरी पोहोचल्यावर दरवाजा आतून बंद होता. यानंतर तिने शेजाऱ्यांना आणि पोलिसांना कळविले. तेव्हा पोलीस घटनासस्थळी दाखल झाले. आणि पोलिसांनी घरचा दरवाजा तोडल्यानंतर त्यांना भूपेश आणि मुलगी आर्या हे दोघेही मृत अवस्थेत आढळले. यानंतर पोलिसांनी दोघांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच भूपेश आणि त्याच्या मुलीला मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आत्महत्येपूर्वी भूपेशने लिहिली सुसाइट नोट

- Advertisement -

पोलिसांनी भूपेशच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांना सुसाईड नोटही सापडली. यात भूपेशने त्यांच्या पत्नीसोबत झालेल्या वादामुळेच हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट सांगितले आहे. आपल्यानंतर मुलीला त्रास होऊ नये म्हणून तिला संपविल्याचे त्यांनी सुसाइड नोटमध्ये कबूल केले आहे. तसेच या सुसाइट नोटमध्ये माझा पैसा, सोने आणि घर माझ्या भाच्याला द्यावी, असा उल्लेखही त्यांनी केला आहे. भूपेशने आत्महत्या करण्यापूर्वी घरातील ९ ते १० तोळे सोने आणि ९ लाख रुपयांची रोख रक्कम काढून जमिनीवर ठेवली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -