मुंबई : क्षुल्लक वादातून एका 29 वर्षांच्या भाजी विक्रेत्यावर दोघांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात उशेल रामलु निली हा जखमी झाला असून त्याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी रेकॉर्डवरील दोघाजणांना अटक करण्यात आली आहे. (a vegetable seller was assaulted over a dispute and two arrested on record)
या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सचिन ऊर्फ राहुल कनोजिया आणि अजय दीपक बनसोडे या दोघांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
हेही वाचा – Nashik Crime News :रेसिंग बाईकवर फिरायला नेलेल्या अल्पवयीन मुलीवर लॉजमध्ये बलात्कार
सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता चेंबूर येथील चेंबूर कॅम्प, गुरु सिंग सभा गुरुद्वारासमोर ही घटना घडली. याच परिसरात उशेल हा भाजी विक्रेता राहतो. त्याचा भाजी विक्रीचा व्यवहार आहे. दोन्ही आरोपी त्याच्या ओळखीचे आहेत. सोमवारी रात्री या दोघांनी उशेलकडे सिगारेटची मागणी केली, मात्र, त्याने सिगारेट देण्यास नकार दिला. याच कारणावरून त्यांनी त्याला बेदम मारहाण करुन तलवारीने प्राणघातक हल्ला केला. त्यात त्याच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली.
जखमी अवस्थेत उशेलला स्थानिकांनी शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. ही माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी उशेलच्या जबानीवरुन पोलिसांनी सचिन कनोजिया आणि अजय बनसोडे या दोघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. तपासात दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह खंडणी, अपहरण, विनयभंग आणि लैंगिक अत्याचारासह पोक्सोच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा – Nashik Police : १४ पिस्तूल, ३७ जिवंत काडतुसे, ४३ तलवारी जप्त