घरक्राइममुंबईतील खळबळजनक घटना; महिला पोलीस अधिकाऱ्याचा राहत्या घरी आढळला मृतदेह

मुंबईतील खळबळजनक घटना; महिला पोलीस अधिकाऱ्याचा राहत्या घरी आढळला मृतदेह

Subscribe

मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईतील कुर्ल्याच्या नेहरुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामगार नगरमध्ये एक महिला पोलीस अधिकारी मृतावस्थेत आढळून आली आहे.

मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईतील कुर्ल्याच्या नेहरुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामगार नगरमध्ये एक महिला पोलीस अधिकारी मृतावस्थेत आढळून आली आहे.

शीतल येडके असे या मृत महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. त्या कामगार नगरमधील शरद सोसायटीमधील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या. प्राथमिक माहितीनुसार, त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याची माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी दिली आहे. परंतु या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.( A woman police officer has been found dead in Kamgar Nagar under the Nehrunagar Police Station limits of Kurla Mumbai )

- Advertisement -

कुर्ल्यातील नेहरुनगर पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलीस उपनिरिधक म्हणून कार्यरत होत्या. परंतु मागच्या दी़ड वर्षांपासून त्या सीक लीव्हवर होत्या. एक वर्षापेक्षा अधिक काळ ड्यूटीवर नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईदेखील करण्यात आली होती, अशी माहिती मिळत आहे.

दुर्गंधी येत असल्याने खुलासा

कामगार नगरमधील शरद सोसायटीमधील पाचव्या मजल्यावर शीतल येडके यांचा फ्लॅट होता. मागील दोन दिवसांपासून पीएसआयच्या येडके यांच्या फ्ल‌ॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलीसांना दिली तेव्हा त्यांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं. नेहरुनगर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी फ्ल‌ॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता शीतल येडके या मृतावस्थेत पडलेल्या आढळल्या. त्यांचा मृत्यू तीन ते चार दिवस आधी झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: “मला सोडा अशी विनवणी ती करत होती पण…” छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने खळबळ )

मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

ज्याअर्थी दुर्गंधी येत होती, त्यानुसार मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम करण्यासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु पोलीसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तर प्राथमिक तपासात महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याची माहिती झोन सहाचे पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी दिली. नेहरुनगर पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -