घरक्राइमACB च्या टीमला पाहताच पठ्ठ्याने गॅसवर केली १५ लाखांची होळी

ACB च्या टीमला पाहताच पठ्ठ्याने गॅसवर केली १५ लाखांची होळी

Subscribe

राजस्थानमध्ये अॅटी करप्शन ब्युरोकडून भष्ट्राचाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. यातच भ्रष्टाचारी अधिकारी कारवाईच्या भीतीने पैसा कुठे ठेऊन कुठे नको याच्या पळवाटा शोधत आहेत. यातच एका पट्याने कारवाईच्या भीतीने चक्क गॅसवर १५ लाख रुपयांची होळी करत सगळे पैसे जाळून टाकल्याची घटना घडली आहे. राजस्थान सिरोह जिल्ह्यातील पिंडवाडा तहसीलमध्ये एसीबीची मोठी कारवाई सुरु होती. यावेळी सरकारी जमिनीचे टेंडर पास करण्यासाठी तहसीलदाराने ठेकेदाराकडून ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. या मागणीनंतर तहसीलदार कार्यलयातील राजस्व निरिक्षक एक लाख रुपयांची रक्कम घेण्यासाठी गेला त्यावेळी पाली एसीबीच्या पथकाने निरिक्षकास रंगेहाथ पकडले.

या प्रकरणात एसीबीच्या टीमने बुधवारी सायंकाळी आरोपी राजस्व निरिक्षकास ताब्यात घेतले. त्यानंतर एसीबीची टीम तहसीलदारास अटक करण्यासाठी पिंडवाडा तहसीलदार कार्यालयात पोहचले. मात्र एसीबीची टीम तहसीलदार कार्यालयात पोहचणार असल्याची खबर मिळताच तहसीलदाराने कार्यालातून धूम ठोकली व सरकारी घरात धुसून लपून बसला. यावेळी एसीबी आणि स्थानिक पोलिसांनी तहसीलदाराच्या घराजवळ पोहचत जोरात आवाज दिला. पण तो अजिबात घराबाहेर आला नाही. मग एसीबीच्या टीमने दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. मात्र प्रवेश केल्यानंतरचे दृश्य पाहून एसीबीची टीम हैराण झाली. कारण तहसीलदार कल्पेश जैन याने कारवाईच्या भीतीने १५ लाख रुपयांच्या नोटा गॅस शेगडीवर ठेवून नोटांची होळी करुन टाकली. यानंतर एसीबीच्या टीमने नोटांनी लागली आग विझवली. व जळलेल्या नोटा ताब्यात घेतल्या. याप्रकरणी आरआय आणि तहसीलदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. या तहसीलदारास पकडण्यासाठी एसीबी आणि स्थानिक पोलिसांनी १ तास अधिक मेहनत घेतली.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -