Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम एकतर्फी प्रेमातून अभिनेत्रीवर चाकूहल्ला

एकतर्फी प्रेमातून अभिनेत्रीवर चाकूहल्ला

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अभिनेत्रीवर चाकूहल्ला केल्याचे समोर आले आहे. यामध्ये अभिनेत्री जखमी झाली आहे.

Related Story

- Advertisement -

दिवसेंदिवस एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या विकृत घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत आहे. नुकताच एका अभिनेत्रीवर एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. चित्रपट अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर चाकूहल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून सध्या तिच्यावर मालवीवर कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमके काय घडले?

अभिनेत्री मालवीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या योगेशकुमार महिपाल सिंग या तरुणाने चाकूहल्ला केल्याचे समोर आले आहे. योगेशकुमार तरुणाचे मालवीवर प्रेम होते. त्यांनी तिला लग्नाची मागणी देखील घातली होती. मात्र, मालवीने ती धुडकावून लावली. या रागातून त्याने तिच्यावर चाकू हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, हल्लेखोर आरोपीने फेसबुकवरुन मालवीशी संपर्क साधला होता. याआधी तीन-चार वेळा तो मालवीला भेटला देखील होता. तसेच आपण निर्माता असल्याचे सांगून त्याने मालवीची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने लग्नासाठी तिला प्रपोज केले होते. तो मालवीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र, तिचा ठाम नकार होता. ती दुर्लक्ष करत असल्याने योगेश तिचा सातत्याने पाठलाग करत असे. परंतु, तिच्याकडून तरीही नकार येत असल्याने संतापलेल्या योगेशकुमार महिपाल सिंग या तरुणाने मालवीवर पाळत ठेवून तिचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार, दोन दिवसांपूर्वी मालवी दुबईहून परतली असता तिच्या इमारतीखाली योगेशकुमार गेला होता. रात्री अंधेरीतील वर्सोवा भागात तो ऑडीने आला आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. मालवीच्या पोटात, मनगटावर आणि बोटावर अशा तीन ठिकाणी वार केले असून सध्या जखमी मालवीवर अंधेरीतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – हनिमून पॅकेजच्या नावाखाली मुंबईकर नवविवाहित दाम्पत्याची फसवणूक; झाली १० वर्षांची कैद!


- Advertisement -