मांस खाण्यावरून आफताबची सक्ती; श्रद्धाच्या शेजारच्यांचा दावा

श्रद्धाने मला सांगितले की ती लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती आणि तिचा प्रियकर आफताब तिला खूप मारायचा. असे श्रद्धाच्या शेजारी राहणाऱ्या पूनम म्हणल्या.

shradha was brutally murdered proved in forensic report as bone dna match with father delhi police inquiry

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर (shraddha walkar) हत्या प्रकरणात सध्या गूढ उकलले जात आहे. दिवसागणिक या प्रकरणात नव नवीन खुलासे होत आहेत अशातच आफताब श्रद्धा वालकरला मांस खाण्याची सुद्धा सक्ती करायचा असा दावा श्रद्धाच्या शेजाऱ्यांनी केला आहे.

श्रद्धाच्या शेजारी राहणाऱ्या पूनम बिदलान यांनी हा खुलासा केला आहे, “जेव्हा श्रद्धा माझ्याकडे आली, तेव्हा ती खूप घाबरलेली होती. तिला कोणीतरी खूप मारले होते. त्यावेळी मी तिला काय झाले असे विचारले तर तिच्या चेहऱ्यावर मारल्याच्या खुणा होत्या. त्या दिवशी श्रद्धा आणि आफताब नॉनव्हेज खाण्यावरुन भांडले होते. श्रद्धाने मला सांगितले की ती लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती आणि तिचा प्रियकर आफताब तिला खूप मारायचा. असे श्रद्धाच्या शेजारी राहणाऱ्या पूनम म्हणल्या.

दरम्यान एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, पूनम यांनी सांगितले, “श्रद्धा सांगत होती की, जेव्हा तिचा प्रियकर तिच्यावर चिडायचा आणि तिला मारायचा. त्यानंतर तो तिला एकटीला सोडूनही निघून जायचा. त्यानंतर तो थेट दुसऱ्या दिवशी परत यायचा.” तू आफताबसोबत राहू नकोस, माझ्यासोबत राहायला ये, असेही पूनम यांनी श्राद्धाला सांगितले. तसेच पोलीसांत तक्रार कर असेही पूनम यांनी श्रद्धाला सांगितले होते.

याच दरम्यान पूनम पुढे म्हणल्या, “जेव्हा आफताबने श्रद्धाला मारले, तेव्हा त्याचे पालक त्यांच्या येऊन त्यांच्याशी बोलले होते.” श्रद्धच्या शेजारी पूनम यांनी केलेल्या या दाव्यामुळे या प्रकरणातले गूढ उलगडण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पुढे आणखी कोणते पुरावे हाती लागतात याकडेही लक्ष लागून राहिले आहे.


हे ही वाचा – आई मी सुंदर दिसतो का?; राहुल गांधींनी सांगितली बालपणातील आठवण