पुणे : सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यातून (Pune) पुन्हा एकदा अत्याचाराचा (Oppression) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना (Corona) काळात पतीचे निधन झाल्यानंतर महिलेने शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. तिने दोघांचा शरीर संबंधाचा ठेवतानाचा व्हिडीओ तरुणाला काढायला सांगितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तापस करत आहेत. हे प्रकरण पुण्यातील कोंढवा (kondhwa) भागातील आहे. (After the death of her husband in Corona a woman had forced intercourse with a minor from the neighborhood Video taken and)
हेही वाचा – अमेरिकेत भारतीय कुटुंबातील तीन जण मृतावस्थेत आढळले, अंगावर गोळ्यांच्या खुणा; काय आहे प्रकरण?
आरोपी महिला पुण्यातील कोंढवा भागात राहत असून तिच्या पतीचे कोरोना महामारीमध्ये निधन झाले. यानंतर तिने शेजारी राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. आरोपी महिला अल्पवयीन तरुणावर अत्याचार करून थांबली नाही तर, तिने दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडीओ काढले. तसेच माझ्यासोबत शरीर संबंध न ठेवल्यसा पोलिसांत जाईल, अशी धमकी देत आरोपी महिलेने त्याला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर 28 वर्षीय महिलेविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महिलेच्या मोबाईलमध्ये दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ सापडल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा – Hyderabad Beggar : बिर्याणी-दारू अन् रिक्षाने प्रवास; भिकाऱ्यांची महिन्याला कमाई तब्बल दोन लाख रुपये
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि पीडित अल्पवयीन तरुण कोंढवा परिसरात एकमेकांचे शेजारी राहतात. कोरोना काळात आरोपी महिलेच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर ती एकटीच राहत होती. तिने अल्पवयीन मुलाला घरी आल्यावर जबरदस्ती केल्याची खोटी तक्रार पोलिसात देईल, अशी धमकी देऊन जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. तसेच शरीर संबंध ठेवतानाचे व्हिडीओ अल्पवयीन तरुणाला काढण्यास भाग पाडले. ही धक्कादाय घटना 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडली आहे. दरम्यान आरोपी महिलेच्या मोबाईलमध्ये दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडीओ असल्याचे पीडित तरुणाच्या कुटुंबीयांना समजले. त्यानंतर त्यांनी कोंढावा पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तरुणाच्या सांगण्यावरुन महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.