घरक्राइमक्राईम पेट्रोल बघून पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट

क्राईम पेट्रोल बघून पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट

Subscribe

गुन्हेगारीच्या घटनांनी नेहमीच चर्चेत असणारे नागपूर एका घटनेने हादरले आहे. क्राईम पेट्रोल बघून पत्नीने पतीच्या हत्येचा कट रचत हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने नागपूरकरांना चांगलाच धक्का बसला आहे. गोरेवाडा भागात दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा पर्दाफाश करुन गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी प्रेयसी आणि प्रियकराला अटक केली आहे. राजश्री डेकाटे आणि रजत सोमकुवर अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपी रजत सोमकुवर हा फिटिंगचे काम करतो. गेल्या ६ वर्षांपासून आरोपी राजश्री डेकाटे आणि रजत सोमकुवर या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, कुटुंबाने तिच्या इच्छेविरुद्ध राजश्री हिचे लग्न राजेश डेकाटे यांच्यासोबत झाले होते. त्यांना चार वर्षांचा वैष्णव नावाचा मुलगा आहे. मात्र, लग्नानंतरही आरोपी राजश्री डेकाटे आणि रजत सोमकुवरचे प्रेमसंबंध सुरूच होते. त्यामुळे पतीला संपवायचा कट आरोपी राजश्री डेकाटेने रचला.

- Advertisement -

आरोपी राजश्रीने पती राकेशला ला माहेरी कार्यक्रम असल्याचे सांगत मंगळवारी सकाळी राजश्री पती राकेश व मुलासह धापेवडा येथे गेली. तिथे पोहोचताच दुपारी ती प्रियकराला भेटली आणि हत्येचा कट रचला. त्यानंतर रात्री राजश्री तिच्या पती राकेश आणि मुलासह मोटारसायकलवरुन येत होती. यावेळई राजश्रीने मुलाला उलटी येत असल्याचे सांगत पती राकेशला गाडी थांबवायला सांगितली. त्याचवेळी आरोपी रजत तोंडाला रुमाल बांधून तिथे आला. त्यानंतर दिखावा म्हणून राजश्रीला लोखंडी रॉड मारला. त्यावेळी राकेश पत्नीवर हल्ला झाला म्हणून मदतीसाठी धावून आला असता आरोपी रजतने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले आणि पसार झाला. हल्ल्यानंतर लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर राकेशला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरु केला.

पोलिसांना प्रकरणाचा तपास करताना राजश्रीच्या मोबाईलची तपासणी केली. त्यावेळई मोबाईलमध्ये आरोपी रजतचे फोटो निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांना या दोघांवर संशय आला. पोलिसांनी राजश्रीची मोबाईल फोनवरील कॉल हिस्ट्री तपासली असता त्यावरून सगळा प्रकार समोर आला.

- Advertisement -

पोलिसांनी राजश्रीची कसून चौकशी केली असता सुरुवातील तिने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर बळाचा वापर केला असता तिने हत्येची कबुली दिली. तिच्या माहितीवरून आरोपी रजतला अटक करण्यात आली. दोघांनीही क्राइम पेट्रोल मालिका पाहून हत्येचा कट रचला होता, अशी कबुलीही दिली. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -