अमरावती हत्याकांडाचा मास्टरमाईंडला नागपूरमधून अटक, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हत्येचा तपास

amaravati umesh kolhe murder mastermind irfan khan arrested from nagpur

अमरावती हत्याकांडातील मास्टर माईंडला नागपुरमधून अटक करण्यात आली आहे. या हत्येचा मुख्य सूत्रधार इरफान शेख घटनेच्या दिवसापासून फरार होता. मात्र त्याला अटक करण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश मिळाले आहे. इरफान शेख अमरावतीमध्ये रेहबर नावाची एक एनजीओ चावलतो. अमरावती येथे मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या उमेश कोल्हे यांच्या हत्येमागे इरफान खान हा सूत्रधार आहे. इरफानच्या सांगण्यावरून अटक केलेल्या सह आरोपांनी ही हत्या घडवून आणली. इरफानच्या आदेशानंतर त्या 6 आरोपींना काहीही विचार न करता एवढी मोठी घटना घडवून आणली होती. या हत्येप्रकरणी एकूण सात आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हत्येचा तपास सुरु आहे.

यापूर्वी उमेश कोल्हे खून प्रकरणात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली होती, त्यांच्यावर भादंवि कलम 302, 120बी, आणि 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने केमिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मारेकऱ्यांनीही उदयपूरमधील टेलर कन्हैयालाल सारखा हत्येप्रमाणेत ही हत्या केली याचा तपास एटीएस करत आहे. यापूर्वी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावेही जाहीर केली होती. आता यात सातव्या नावाचाही समावेश झाला आहे.

इरफान शेख (हत्येचा मास्टरमाइंड मुदासीर), अहमद (उर्फ सोनू राजा साकीब्राहिम), शाहरुख पठाण (उर्फ​बादशाह हिदायत खान), अब्दुल तौफिक (उर्फ नानू शेख तस्लीम), शोहेब खान (उर्फ ​​बुरिया साबीर खान), अतिप रशीद आदिल रशीफ, डॉ.युसूफ खान बहादूर खान अशी या आरोपींची नावे आहेत.

नेमकी घटना काय?

उमेश कोल्हे नावाच्या 50 वर्षीय मेडिकल केमिस्टची गळा चिरून खून करण्यात आली. या हत्येप्रकरणी अमरावती पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर याच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे कारण समोर येत आहे. त्यांनी फेसबुकवर नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली होती. तपासासाठी एनआयएचे एक पथकही आज अमरावतीत पोहोचले आहे. सर्व आरोपींनी एका व्यक्तीच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. पोलिस सूत्रधाराचा शोध घेत आहेत. या प्रकरणात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून पोलीस हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळत आहेत.


राज्यपाल कशाची वाट बघतं होते हे आज कळलं; जयंत पाटलांची टोलेबाजी