घरक्राइमCrime News : क्षुल्लक कारणावरून अँब्युलन्स चालकाची हत्या, नवी मुंबईतील घटनेने खळबळ

Crime News : क्षुल्लक कारणावरून अँब्युलन्स चालकाची हत्या, नवी मुंबईतील घटनेने खळबळ

Subscribe

नवी मुंबईतील नेरुळ येथे डॉ. डी .वाय. पाटील रुग्णालयासमोर एका रुग्णवाहिका चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ येथे डॉ. डी .वाय. पाटील रुग्णालयासमोर एका रुग्णवाहिका चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चौघांनी या अँब्युलन्स चालकाला गाडीतून खाली खेचून बाहेर काढले. यानंतर त्या चालकाला बांबूने बेदम मारहाण करत शेवटी चाकूने सपासप वार केले. रुग्णवाहिका चालक हा डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या परिसरात अँब्युलन्स पार्क करत असताना ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या चालकाला मारून त्यानंतर त्याच्या मानेत खुपसलेला चाकू तशाच अवस्थेत टाकून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. युवराज अमरेंद्र सिंह (वय 30 वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सांगण्यात आले आहे. (ambulance driver was killed by four people in Navi Mumbai for a trivial reason)

हेही वाचा – Illegal Abortion : धक्कादायक! ‘या’ राज्यात तीन वर्षांत सुमारे 900 अवैध गर्भपात

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, युवराज अंजमेंद्र सिह हा रुग्णवाहिकेवर मदतनीस आणि वेळप्रसंगी चालकाचे काम करत होता. काल (ता. 26 नोव्हेंबर) रविवारी रात्री साडेआठ पावणे नऊच्या सुमारास नेरुळ येथील डॉ. डी वाय. पाटील रुग्णालय समोर रुग्णवाहिका पार्क करण्यासाठी चालक ज्ञानेश्वर नाकाडे हे घेऊन येत होता. त्यावेळी त्याच्या समवेत युवराज सुद्धा होता. गाडी पार्क करण्यापूर्वीच अचानक चार अनोळखी व्यक्तींपैकी एकाने रुग्णवाहिकेतून युवराज याला खेचून बाहेर काढले. त्यानंतर दुसऱ्याने बांबूने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तर तिसऱ्याने रुग्णवाहिकेची नासधूस केली. मात्र ज्ञानेश्वर यांनी तशीच गाडी पुढे नेली.

त्यानंतर, इकडे गाडी खाली खेचून बाहेर काढलेल्या युवराज याच्यावर चौघांनी जीवघेणा हल्ला करत त्यास मारहाण केली. तर त्यातील एकाने चाकूचे वार केले. त्यात त्याच्या पोटात, हातावर दिसेल तेथे वार करण्यात आले. यावेळी युवराजच्या मानेतही चाकू खुपसण्या आला. ज्यामुळे तेथेच युवराज कोसळला. तो मयत झाल्याची खात्री पटताच चौघेही पळून गेले. घटनेबाबत चालक ज्ञानेश्वर यांनी रुग्णवाहिका मालक सिध्देश्वर चितळकर आणि नेरुळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवराज याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. हत्या का केली ? याबाबत अद्याप ठोस कारण समोर आले नाही. मात्र, नारळ चोरल्याच्या क्षुल्लक कारणावरून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर या घटनेतील दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांच्यांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -