अमरावती : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सतत महिलांसंदर्भातील गुन्हे समोर येत असल्याने राज्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. महिलांवर होणारे अत्याचार यामध्येही वाढ झाल्याने या गुन्ह्याविरोधात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महिला वर्गातून करण्यात येत आहे. अशातच आता अमरावतीतील दोन तरुणींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही तरुणींवर एकाच नराधमाने अत्याचार केला आहे. अगदी सारख्याच वेळेत आरोपीने हे कृत्य केल्याचेही आता उघड झाले आहे. मंगळवारी (ता. 04 फेब्रुवारी) रात्री ही घटना उघडकीस आली आहे. (Amravati Crime same accused raped two girls by increasing their identity through Instagram)
मिळालेल्या माहितीनुसार, सुर्यकांत सोनी (वय वर्ष 25, राहणार – दर्यापूर) नामक आरोपीची 2022 मध्ये अमरावतीतील दोन मुलींसोबत इन्स्टाग्रामवर ओळख केली. या दोन्ही मुलींचे वय त्यावेळी 16 आणि 17 वर्ष होते. आरोपीने दोन्ही तरुणींशी ओळख वाढवली आणि तो दोघींनासुद्धा भेटू लागला. तो या मुलींना दर्यापूर हिंगणी रोड येथील वृंदावन पार्क समोरील मोकळ्या जागेत भेटण्यास बोलवित असे. त्याने 2022 ते 2025 या कालावधीत या दोन्ही तरुणींवर आरोपीने त्यांच्या इच्छा नसतानासुद्धा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर मुलींनी भेटण्यास नकार दिला असता आरोपी युवकाकडून फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत होती.
आरोपीच्या त्रासाला कंटाळलेल्या या तरुणींनी याबाबतची पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु, आता हा आरोपी फरार असून पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पीडित तरुणींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार व पोस्कोअर्तगत गुन्हे दाखल करून घेतला आहे. परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी ओळख करून आरोपींने केलेल्या कृत्याबाबत आता जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ या आरोपीविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. तर या घटनेचा वेगाने तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. परंतु, राज्यात महिलांच्याबाबतीत वाढत्या अत्याचाराच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.