घरक्राइमडॉलर्स देण्याचे प्रलोभन देत चालकाची २ लाखांची फसवणूक

डॉलर्स देण्याचे प्रलोभन देत चालकाची २ लाखांची फसवणूक

Subscribe

मुंबईतील साकीनाका परिसरातील घटना

स्वस्तामध्ये डॉलर्स देण्याचे प्रलोभन देत घाटकोपर साकीनाक्यात एका चालकाची दोन लाखांची फसवणुक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चालकाला अनोखळी व्यक्तीने स्वस्त डॉलर्स देतो असे सांगत त्याबदल्यात दोन लाखांची मागणी केली. यावेळी चालकाने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत दोन लाख रुपये दिले मात्र या अनोखळी व्यक्तीने डॉलर्सच्या बदल्यात कागदाचे बोळे देत चाकलाची फसवणुक केली. हा चालक पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहणाऱ्या लोकांना भाड्याने वाहने पुरवणाऱ्या कंपनीत नोकरी करतो. दरम्यान या चालकाची साकीनाका परिसरातील एका अनोखळी व्यक्तीशी ओळख झाली. यावेळी या अनोखळी व्यक्तीने चालकाला विश्वासात घेते. यानंतर बोलता बोलता या अनोळखी व्यक्तीने माझ्या मित्राकडे ५ हजार अमेरिकन डॉलर असून त्याला या डॉलरचे पैशात रुपांतर करायचे आहे. त्याला पैशांची नितांत गरज असल्याने बाजारभावापेक्षा कमी किंमतीत तो डॉलर विकणार असल्याचे चालकाला सांगितले. यावर चालकाचाही विश्वास बसला.

यानंतर चालकाने डॉलरसंदर्भाची कल्पना आपल्या कंपनी मालकाला दिली. स्वस्त डॉलर्स मिळणार असल्याच्या लोभापायी कंपनी मालकानेही पैसे देण्यास तयारी दर्शवली. त्यानुसार तीन तरुण ५ हजार डॉलर्स घेऊन चालकाला भेटले. या तरुणांनी आणलेल्या पिशवीतून काही डॉलर चालकाला दाखवले यावेळी चालकालाही विश्वास बसला आणि त्याने तीन लाख रुपये देण्याचे मान्य केले. यानंतर ठरलेल्या ठिकाणी चालकाने दोन लाख रुपये दिले व तेव्हा या तीन तरुणांनी डॉलर भरलेली बॅग चालकाला दिली. तर उर्वरित १ लाख रुपये चालकाच्या कंपनीच्या कार्यालयात देण्याचे ठरविण्यात आले. यानंतर उर्वरित १ लाख रुपये घेण्यासाठी हे तरुण कार्यालयात येतो असे सांगून निघून गेले. व चालकही डॉलर्सनी भरलेली बॅग घेऊन कार्यालयात पोहचला. मालकासमोर चालकाने बॅग उघडली तेव्हा त्यात चक्क कागदाचे बोळे आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चालक आणि त्याच्या कंपनी मालकाने साकीनाका पोलीस स्थानक गाठले. व त्या अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. यासंदर्भात आता साकीनाका पोलीस या अज्ञात व्यक्तींचा शोध घेत आहेत. फेब्रुवारी महिन्यातच अशाप्रकारे पाच लाखांची फसवणुक झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे या फसणुक करणाऱ्यांची एक मोठी टोळी असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

- Advertisement -

हेही वाचा- धक्कादायक! कोरोना ‘पॉझिटिव्ह’ महिलेकडे डॉक्टराने केली शरीरसुखाची मागणी

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -