घरक्राइम'सरप्राईज डेट'च्या बहाण्याने बोलवत मुलीने भावी पतीचा आवळला गळा; पुढच्या महिन्यात होते...

‘सरप्राईज डेट’च्या बहाण्याने बोलवत मुलीने भावी पतीचा आवळला गळा; पुढच्या महिन्यात होते लग्न

Subscribe

मानेला खोलवर जखम झाल्याने तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आई- वडिलांनी निवडलेल्या तरुणाशी लग्न करण्यास तयार नसलेल्या तरुणीने आपल्या भावीबरोबर एक धक्कादायक कृत्य केले आहे. या तरुणीने आपल्या भावी पतीबरोबर जे केले ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. संबधीत तरुणाने आपल्या भावी पतीला ‘सरप्राईज डेट’च्या बहाण्याने भेटायला बोलवत त्याच्या गळ्यावर सपासप वार केले आहेत. यामुळे तरुणाच्या मानेवर खोलवर जखम झाली असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती आंध्रप्रदेश पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणमधील चुडावरम येथे ही घटना घडली आहे. औद्योगिक संशोधन परिषदेत (CSIR) शास्त्रज्ञ असलेले राम नायडू असे जखमी झालेले तरुणाचे नाव आहे. पुढच्या महिन्यात त्याचे पुष्पा नावाच्या तरुणीशी लग्न होणार होते. 22 वर्षे जुनी पुष्पा शाळेतून ‘ड्रॉपआऊट’ आहे.

- Advertisement -

राम नायडूला सरप्राईज डेटसाठी भेटण्यापूर्वी आरोपी तरुणी पुष्पाने तीन चाकू खरेदी केले होते. दरम्यान पुष्पाचा फोन पाहून राम तिला भेटण्यासाठी आला. यावेळी तरुणीने त्याच्या गळ्यावर सपासप वार केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी एस गौतमी यांनी सांगितले की, “या मुलीचे पूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही.”

पुष्पाने आपल्या भावी पतीला “सरप्राईज डेट” च्या बहाण्याने भेटण्यासाठी तिला एका टेकडीवरील मंदिराजवळ बोलावले. यावेळी तिने चाकूने रामच्या मानेवर वार करून गंभीर जखमी केले.

- Advertisement -

राम नायडूंना जेव्हा रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा त्यांच्या पांढऱ्या शर्टवर रक्ताचं डाग पडलेलं होतं, असं या दृश्यांमध्ये दाखवण्यात आलं होतं. आई-वडिलांनी निवडलेल्या राम नायडू या तरुणाशी लग्न करायचं नाही, असं या तरुणीने पोलिसांना सांगितलं. तिने या लग्नाला विरोधही केला होता, पण तिच्या आई-वडिलांनी त्याकडे लक्ष दिलं नाही.


Nirmala Sitharaman in US : यंदा देशात 75 डिजिटल बँका होणार सुरू; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -