घरक्राइमअँटॉप हिल परिसरातील मुंडके नसलेल्या मृहदेहाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

अँटॉप हिल परिसरातील मुंडके नसलेल्या मृहदेहाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

Subscribe

मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ४ पथकाने एका अत्यंत क्लिष्ट खुनाचा उलघडा केला आहे. अँटॉप हिल परिसरातील एसीपी कार्यालय असलेल्या इमारतीच्या पाठीमागे मुंडके विरहित अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मुंडके नसलेल्या या मृतदेहाचे हाय-पाय तोडून बांधलेल्या अवस्थेत आढळले होते. यामुळे हत्येचा कुठलाच सुगावा पोलिसांना लागत नव्हता. मात्र गुन्हे शाखेच्या कक्ष ४ च्या पथकाने मोठ्या शिताफिने या गुन्हाचा छडा लावत उलगडा केला आहे.

मुंडके नसलेल्या या मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी सखोल तपास करत याप्रकरणी एसीपीचा पोलीस वाहनावरील चालक आणि त्याची पत्नी या दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा मुंबई पोलिसांच्या ट्रान्सपोर्ट विभागात पोलीस शिपाई आहे. मात्र ही हत्या कोणत्या गोष्टीसाठी करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दोघांना शनिवारी अटक करण्यात आली असून दोघांना आज सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय ?

अँटॉप हिल परिसरातील सेक्टर ७ मधील एसीपी कार्यालयाच्या मागच्या बाजूस एका व्यक्तीचा हात-पाय तोडून बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह एका प्लॅस्टिकच्या बॅगेत आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. १ ऑक्टोबरच्या सकाळी साडे सातच्या सुमारास हा प्रकार उघडीस आला. एका पुरुषाचा तो मृतदेह होता. मात्र हत्येनंतर पुरावे मिटवण्यासाठी त्या मृतदेहाला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात काही दिवस दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तपास कार्य सुरू करत आरोपींना दहा दिवसांत बेड्या ठेकल्या आहेत.

या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपींने त्याचे मुंडकं देखील गायब केले होते. मात्र डीसीपी, एसआरपीआय आणि झोन ४ गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभार्याने दखल घेत वेगाने तपास कार्य सुरू केले. आणि अखेर आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र हत्ये मागचे नेमकं कारण काय आहे? हे अद्याप समोर आलेले नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -