घरक्राइमबोगस डॉक्टर स्वप्ना पाटकरला अटक

बोगस डॉक्टर स्वप्ना पाटकरला अटक

Subscribe

पीएचडी डिग्रीमध्ये काही त्रुटा असल्याचे दिसून आले.

बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून एका नामांकित रुग्णालयात ऑनररी कन्सल्टन्ट म्हणून नोकरी करणार्‍या एका महिला डॉक्टरला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. स्वप्ना पाटकर असे या महिलेचे नाव असून तिला बुधवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. गुरदिपकौर हरींदर सिंग या समाजसेविका असून त्या सध्या अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहतात. त्यांची माता गुजरी नावाची एक एनजीओ संस्था असून त्या गरजू आणि व्यथित लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. एप्रिल 2021 रोजी त्यांना एक बंद लिफाफा प्राप्त झाला होता, त्यात त्यांना काही स्वप्ना पाटकर यांच्या वैद्यकीयसह इतर कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती होत्या.

या झेरॉक्समध्ये छत्रपती शाहूजी महाराज विश्वविद्यालय, कानपूर येथील 2009 मधील क्लिनीकल सायकॉलॉजी या विषयांत स्वप्ना पाटकर यांना पदवी प्रदान करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच त्यांनी इन्सलुएन्स ऑफ इमोशन्स ऑन ह्युमन माईंड-ए स्टडी बियाँड प्रॉब्लेम सॉल्व्हींग अ‍ॅण्ड डिसीजन मेकींग या विषयावर छत्रपती शाहूजी महाराज विश्वविद्यालयात डॉ. रविंद्र कुमार यांच्या देखरेखीखाली प्रबंध सादर केला होता. या प्रबंधावर डॉ. रविंद्रकुमार यांनी त्यांना दिलेले प्रमाणपत्र, एका नामाकित रुग्णालयाच्या ओपीडी शेड्युलची माहिती  होती. त्यात डॉ. स्वप्ना पाटकर यांनी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये पीएचडी केल्याचे, त्यावर बीएचएमएस, फेलोशीव इन न्यूरोलॉजीकल रिहॅबीलीटेशन, न्यूरोबायोलॉजी अ‍ॅण्ड बिहेव्हीयर, एमबीए-एचआरएम अ‍ॅण्ड सर्व्हिस असे नमूद करण्यात आले होते.

- Advertisement -

या सर्व कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर त्या सध्या संबंधित नामांकित रुग्णालयात क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या सर्व वैद्यकीय पदव्या बोगस असताना त्या डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करीत आहेत. स्वप्ना पाटकर एक प्रकारे त्या मानसिकदृष्ठ्याबाधित लोकांच्या जिवाशी खेळ करीत आहेत. त्यांची फसवणूक करुन मोठी रक्कम घेत आहेत. पीएचडी डिग्रीमध्ये काही त्रुटा असल्याचे दिसून आले. पीएचडीची ही डिग्री बोगस असल्याचे खात्री होताच गुरुदिपकौर यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्याप्रकरणी स्वप्ना पाटकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत मंगळवारी दुपारी त्यांना पोलिसांनी अटक केली. बुधवारी त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. या वृत्ताला वांद्रे पोलिसांनी दुजोरा दिला, मात्र अधिक तपशील देण्यास नकार दिला आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -