Eco friendly bappa Competition
घर क्राइम NCB raid on Mumbai cruise : आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कस्टडी

NCB raid on Mumbai cruise : आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कस्टडी

Subscribe

बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईच्या किला कोर्टाने येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटच्या लिंक्स आढळून आल्यानेच आम्हाला आर्यनच्या चौकशीसाठी त्याची कोठडी हवा असल्याचा युक्तीवाद नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या वतीने करण्यात आला. आर्यनसह मुनमुन आणि अरबाज यांनाही आज कोर्टात दाखल करण्यात आले होते. या दोघांनाही ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. एकुण आठ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीने  कार्डेलिया क्रूझवर एनसीबीने टाकलेल्या धाडीनंतर आज एनसीबीने कोर्टाकडे १३ ऑक्टोबरपर्यंत कस्टडीची मागणी केली होती. एनसीबीने या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे.

- Advertisement -

संपुर्ण प्रकरणात अनेक संशयित आरोपी आहेत ज्यांची अजून ओळख पटवयाची आहे त्यासाठी चौकशी गरजेची आहे. आर्यन खान हा पेमेंट करण्यासाठी कशाच्या माध्यमातून करायचं हे विचारताना दिसतोय. तसेच संपुर्ण संभाषणात बऱ्याच कोडवर्डचा वापर यात करण्यात आला आहे. आम्ही आरोपींच्या चौकशीदरम्यान जुहूमधील 9 व्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले, अशीही माहिती एनसीबीने कोर्टात दिली.

कोणाचा काय युक्तीवाद ?

- Advertisement -

संपुर्ण ड्रग्ज प्रकरणात या आरोपींवर जामीन मिळणारे असे सेक्शन जरी लावलेले असले, तरीही मी मुंबई हायकोर्टात सुनावणी झालेली तीन उदाहरण समोर ठेवतो ज्यामध्ये NDPS ऍक्टमधील प्रकरणत नाकारण्यात आला होता, असे एनसीबीकडून एएसजी अनिल सिंह यांच्याकडून सांगण्यात आले. अनिल सिंग यांनी रिया चक्रावर्तीची ऑर्डर वाचून दाखवली. या प्रकरणात रियाला जामीन नाकारण्यात आला होता. रिया चक्रवर्तीच्या प्रकरणात ndps ऍक्टमधील सेक्शनमध्ये जामीन नाकारण्यात आला होता.

तर आम्ही समाजाला ड्रग्समुक्त बनवण्याची मोहीम राबवतोय त्यामुळे तुमच्याकडे कमी प्रमाणात ड्रग्स सापडलं याचा अर्थ तुम्हाला बेल मिळावी असे तुम्ही म्हणू शकत नाही, एनसीबीच्या वकिलांनी कोर्टात दावा केला.

त्यानंतर मुंबई हायकोर्टातील एका निकालाचा संदर्भ आर्यन खानसाठी सतीश मानेशिंदे यांनी दिला. सोहेल खान विरुद्ध राज्य सरकार सूनवणीचा संदर्भ त्यांनी दिला. सतीश मानेशिंदे यांच्याकडून स्टेफन मुल्लाच्या केसचाही कोर्टात संदर्भ देण्यात आला. मी आता रियाच्या जजमेंटवर बोलतो. तिच्यावर आरोप होता की ड्रग्ससाठी तिने पैसे पुरवले आणि ड्रग्सच्या अधीन नेलं. इथे आर्यन खानवर तसा आरोप नाहीये, असेही मानेशिंदे म्हणाले. तसेच मानेशिंदे अलाहाबाद कोर्टातील तिसर जजमेंट वाचून दाखवले.

व्हाट्सए चॅट माझ्या कस्टडीसाठी पुरेसे नाहीत. माझ्याकडे काही सापडलं आहे का ? किंवा इतर गोष्टींचाही विचार करावा. आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट एकत्र होते याचा अर्थ त्याच्यात साम्य आहे असं नाही, असेही मानेशिंदे यांनी कोर्टासमोर स्पष्ट केले. तीन आरोपीमध्ये फक्त 5 ग्रॅम चरस सापडलं, तरीही कोकेन एमडीएमए असा उल्लेख एनसीबीने अटकेवेळी केलाय असेही मानेशिंदे म्हणाले. कोणाकडून काय ड्रग्स सापडलं याची माहिती एनसीबीने दिली नाही.

 


 

- Advertisment -