घरक्राइमफेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न; आयर्लंडमधून माहिती मिळताच पोलिसांनी वाचवले प्राण

फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न; आयर्लंडमधून माहिती मिळताच पोलिसांनी वाचवले प्राण

Subscribe

फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवण्यात आयर्लंड फेसबुक अधिकारी आणि महाराष्ट्र पोलिसांना यश आलं आहे. धुळ्यातील २३ वर्षीय तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं आयर्लंडच्या फेसबुक अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलिसांना याबाबतची माहित देत संबंधित तरुणाचा जीव वाचवला. या घटनेत मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या तरुणाची प्रकृती ठिक असून त्याचं काऊन्सिलिंग केलं जाणार आहे.

धुळ्यातील २३ वर्षीय तरुणाने रविवारी रात्री फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला. लाईव्ह सुरु होताच त्याने स्वत:च्या मनगटाची नस कापली. रविवारी रात्री ८:१० च्या सुमारास हा प्रकार घडला. तरुण आत्महत्या करत असल्याचं आयर्लंडमधील फेसबुक अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ताबडतोब मुंबई पोलीस उपायुक्त रशअमी करंदीकर यांना फोन करत माहिती दिली. माहिती मिळताच रश्मी करंदीकर यांनी तात्काळ पाऊलं उचलत धुळे पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. स्थानिक पोलिसांनी माहिती मिळताच २५ मिनिटांतच तरुणाचा शोध घेत त्याचे प्राण वाचवले. तरुण धुळ्यातील ज्या भागातून लाईव्ह करत होता ते ठिकाण पोलिसांनी ट्रॅक केलं. नाशिकचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर आणि धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. रात्री नऊच्या सुमारास पोलीस त्याच्या घरापर्यंत पोहोचले होते. तरुणाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर सोमवारी त्याला डिस्चार्जही देण्यात आला. आता त्याचं काऊन्सिलिंग केलं जाणार आहे. डीसीपी रश्मी करंदीकर यांनी सर्व तांत्रिक माहिती वेळेत उपलब्ध करुन दिल्यामुळे तात्काळ कारवाई करत त्याचे प्राण वाचवता आले, असं धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -