उत्तर प्रदेशात श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; प्रेयसीच्या शरीराचे केले 6 तुकडे

वसईतील श्रद्धा वालकर हत्याकाडांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हत्याकांडासंबंधीत थरकाप उडवणारे नवनवे खुलासे समोर येत आहेत. मात्र श्रद्धा वालकर हत्याकांडाची आता उत्तरप्रदेशातही पुनरावृत्ती झाली आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी प्रियकराने 6 तुकडे केले. ही ह्रदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील आझमगढ भागात घडली आहे. आझमगढमध्ये काही दिवसांपूर्वी एका विहिरीत एक मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह अगदी छिन्नविछिन्न अवस्थेत होता, या मृतदेहाचे 5 ते 6 तुकडे करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस तपासासाठी त्याच्यासह घटनास्थळी गेले. त्यावेळी आरोपीने लपवून ठेवलेल्या गावठी बंदूकीतून पोलिसांवर गोळीबार केला. त्यामध्ये आरोपीचं जखमी झाला आहे. दरम्यान पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीची पोलिसांकडून आता कसून चौकशी सुरु आहे. आरोपीने दिेलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मृतदेहाचं शीर ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आरोपी प्रियकराने प्रेयसीच्या हत्येची कबूली दिली आहे.

आझमगढ जिल्ह्यातील अहरौला पोलीस स्टेशन हद्दीतील गौरी का पुरा गावात रस्त्याकडील एका विहिरीत 15 नोव्हेंबरला हा मृतदेह आढळून आला होता. ज्यात मृतदेहाचे तुकडे केले होते. आधीच दिल्ली श्रद्धा हत्याकांडामुळे देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात ही घटनाही त्याचप्रमाणे असल्याने पोलिसांनी सखोल चौकशी सुरु केली आहे, या प्रकरणाचा तपास करणं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं. मात्र तरुणीची ओळख पटवून तिच्या नातेवाईकांची आणि मित्रांची चौकशी केली, त्यावरून पोलिसांनी हत्येतील मुख्य आरोपीला अटक केली आहे.

पोलीस तपासातील माहितीनुसार, मृत तरुणीचा एक मित्र होता. त्याच्या भाव प्रिंससोबत तिची ओळख झाली होती. त्याला ती भेटायची. हत्येच्या दिवशी तरुणी भैरवधामला जाण्यासाठी घरातून निघाली होती, आरोपी प्रिंसने तिला बाईकवरून नेऊन सोडलं. घटना घडली त्यादिवशी मृत तरुणी आणि आरोपी एकत्र होते. दोघांनी हॉटेलमध्ये जेवण केलं. त्यानंतर संध्याकाळी घरी जात असताना आरोपीने तिती गळा दाबून हत्या केली, यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते पॉलिथिनच्या बॅगेत भरून वेगवेगळ्या जागांवर फेकून दिले.

आरोपी प्रिंसने तपासात सांगितले की, मृत तरुणीसोबत त्याचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रिंस कामासाठी विदेशात गेला. यादरम्यान फेब्रुवारीमध्ये मृत तरुणीने दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह केला. ही माहिती प्रिंसला मिळाली तेव्हा तो परदेशातून परत आला, त्यानंतर तरुणीला लग्न करत असं म्हणत धमकावू लागला, एवढचं नाहीत प्रिंसने मृत तरुणीच्या आई- वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी विरोध केल्यानंतर त्याने 29 ऑक्टोबर रोजी तरुणीच्या हत्येचा कट रचला.

पोलिसांच्या चौकशीत प्रिंसने गळा दाबून हत्या केल्याची कबूली दिली. तसेत चाकूच्या मदतीने तिच्या शरीराचे तुकडे करुन ते पॉलिथिन बॅगेत भरून विहिरीत फेकून दिले. पोलिसांना मृत तरुणीचं शीर सापडलं असून त्यांनी ते ताब्यात घेतलं आहे. याशिवाय हत्येसाठी वापरलेल्या दोन बॅग आणि कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे.


छत्रपती शिवरायांवरील वादावर फडणवीस स्पष्टचं म्हणाले, ‘राज्यापालांच्या वक्तव्याचा विपर्यास’