घरक्राइमऔरंगजेबाच्या समर्थनाचे पडसाद, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी

औरंगजेबाच्या समर्थनाचे पडसाद, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी

Subscribe

मुंबई – समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांच्या स्वीय सहाय्यकाला फोन करून ही धमकी देण्यात आली असून याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आबू आझमी यांनी औरंगजेबाचं समर्थन केलं होतं. यावरून त्यांच्या पीएला एक धमकीचा फोन आला होता. आझमी यांना शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आझमींना फोन दे. तो पुन्हा बोलला तर उडवून टाकणार. कापून टाकणार, अशी अज्ञाताने धमकी दिली.

- Advertisement -

याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कुलाबा पोलिसांनी कलम ५०६ (२) आणि ५०४ अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

नेमकं प्रकरण काय

- Advertisement -

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबत वक्तव्य केलं होतं. तो क्रूर आणि द्वेष्टा नव्हता असं आव्हाड म्हणाले होते. यावरून  राज्यात वादंग निर्माण झालं होतं. दरम्यान, अबू आझमींनीही औरंगजेबाबाबत चुकीचा इतिहास दाखवला गेला असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांना धमकी फोन आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -