घरक्राइमकौटुंबिक वादातून बीएआरसीच्या वैज्ञानिकाची गळफास घेऊन आत्महत्या

कौटुंबिक वादातून बीएआरसीच्या वैज्ञानिकाची गळफास घेऊन आत्महत्या

Subscribe

पत्नीसोबत मुलांच्या जेवणावरुन झाला होता वाद

ट्रॉम्बे येथे बीएआरसीच्या एका वैज्ञानिकाने आत्महत्या केली. अनुज त्रिपाठी असे या ३७ वर्षीय वैज्ञानिकाचे नाव असून कौटुंबिक वादातून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता ट्रॉम्बे येथील अणुशक्तीनगर, आकाशरत्ना अपार्टमेंटमध्ये घडली. या अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ९०१ मध्ये अनुज हे त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत राहत होते. ते सध्या बीएआरसीमध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. गुरुवारी सकाळी त्यांचे पत्नी सरोजसोबत मुलांच्या जेवणावरुन वाद झाला होता. याच वादानंतर ते त्यांच्या रुममध्ये गेले आणि तिथेच त्यांनी पंख्याला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार नंतर उघडकीस येताच त्यांना स्थानिक रहिवाशांनी तातडीने बीएआरसीच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी त्यांची पत्नी सरोज त्रिपाठी यांची जबानी नोंदविण्यात आली असून त्यांनी मुलांवरुन त्यांच्यात वाद झाल्याचे आपल्या जबानीत नमूद केले आहे. या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. अनुज यांच्या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -