घरक्राइमपैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष देत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष देत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

Subscribe

भोंदूबाबासह चार जणांना नागपूर पोलिसांकडून बेड्या

पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष देत अल्पवयीन तरुणीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. याप्रकरणी लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा आणि त्याच्या टोळीला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डी आर उर्फ सोपान कुमरे असं अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचं नाव असून त्याच्यासोबत त्याच्या टोळीतील विक्की खापरे, दिनेश निखारे, रामकृष्ण म्हसरकर व विनोद मसराम सदस्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.या अल्पवयीन तक्रारदार मुलीची भोंदूबाबाच्या टोळीतील विक्की खापरे नावाच्या तरुणासोबत ओळख झाली होती. यावेळी विक्की खापरेने या अल्पवयीन मुलीला आपल्याला एका बाबाकडे जायचं आहे तिथं तो आपल्याचा तंत्र मंत्राच्या साहाय्याने पैशांचा पाऊस पाडून देईल त्यामळे तुझ्या कुटुंबातील आर्थिक अडचणी कमी होतील असे अमिष दाखविले.

मात्र या अल्पवयीन मुलीला विक्कीच्या बोलण्यावर शंका आली, तिने लगेच पोलिसांत धाव घेत सारा प्रकार सांगितला. यावेळी नागपूर गुन्हे शाखेने नागपूरच्या चिमूर रस्त्यावर एका शेतावर छापा टाकत भोंदूबाबाला बेडया ठोकल्या आहे. यावेळी चौकशीत भोंदूबाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष देत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली. या भोंदूबाबा डीआर उर्फ सोपानच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो आढळून आले आहेत. त्यामुळे या भोंदूबाबाने यापूर्वीही अनेक तरुणींचे शोषण केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरुणींना आपल्या जाळ्यात अडकण्यासाठी भोंदूबाबा सोपनने चार तरुणांना हाताशी धरले होते. हे तरुण तरुण मुलींशी पक्की मैत्री करत त्यांना भोंदूबाबा सोपनकडे घेऊन यायचे. या कामाकरित तरुणांना मोठी रक्कम भोंदूबाबा देत असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा- नाशिकमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -