घरक्राइमकॅब बुक केली आणि खात्यातून १ लाख गायब; वाचा काय आहे प्रकरण

कॅब बुक केली आणि खात्यातून १ लाख गायब; वाचा काय आहे प्रकरण

Subscribe

अनेकवेळा जिथे आपल्याला टॅक्सी, रिक्षा मिळत नाही. त्यामुळे अनेकजण घरुनच प्रवासासाठी कॅब बुक करतात. कोरोनाच्या काळात तर हे प्रमाण वाढले आहे. मात्र, कॅब बुक करताना आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो. याची कल्पना आहे का आपल्याला. कारण, कॅब बुक करताना खात्यातून पॅसे गायब झाल्याची घटना ग्रेटर नोएडा येथे घडली आहे. पैसे अशा पद्धतीने चोरले की तुम्हालाही धक्काच बसेल.

ग्रेटर नोएडा वेस्ट गौर सिटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिला डॉक्टरकडून कॅब बुकच्या नावाखाली चोरांनी खत्यातून एक लाख रुपये लंपास केले. महिला डॉक्टर कॅब बुक करण्यासाठी गुगलवरुन नंबर घेतला आणि कॉल केला. त्यानंतर चोरांनी त्या महिलेचा फोन नंबर शोधला. त्यानंतर त्या महिलेला फोन केला आणि कॅब भाडे ऑनलाईन भरण्यास सांगितले. चोरांनी महिलेला एक App डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर चोरांनी महिलेच्या खात्यातून एक लाख रुपये लंपास केले. महिलेने या प्रकरणाची तक्रार बिसरख पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

- Advertisement -

महिला डॉक्टरने दिलेल्या जबाबात असे म्हटले आहे की, नोएडाच्या खासगी रुग्णालयात काम करते आणि अनेकदा कॅबद्वारे रुग्णालयात येते. यावेळी तिने गुगलवरुन कॅब कंपनीचा टोल फ्री नंबर मिळवून फोन केला. मनीष शर्मा नावाच्या व्यक्तीने तिला कॉल करून ऑनलाईन भाडे भरण्यासाठी App ची लिंक दिली. त्यानंतर १ लाख रुपयांची फसवणूक केली. महिला डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नोएडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


हेही वाचा – क्राईम पेट्रोल बघून पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -