Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम ...म्हणून सासरच्यांनी मुलीला सून म्हणून नकारले, प्रेमी युगुलांनी आपले आयुष्यचं संपवले

…म्हणून सासरच्यांनी मुलीला सून म्हणून नकारले, प्रेमी युगुलांनी आपले आयुष्यचं संपवले

मुलाच्या कुटुंबियांनी दोघाच्या लग्नाला नकार दिल्याने दोघांनाही गळफास घेऊन आत्महत्या केली.

Related Story

- Advertisement -

प्रेमात नकार दिल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या प्रेमी युगुलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कधी आर्थिक कारणांमुळे मुलीकडचे मुलाला नाकारतात. तर कधी जाती भेदामुळे प्रेमाला नकार मिळतो. प्रेम यशस्वी न झाल्याने प्रेमी युगुल आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात. कधी प्रेमभंगामुळेही प्रेयसी किंवा प्रियकर आपले जिवन संपवतात. कुटुंबाकडून प्रेमाला नकार देण्यासाठी अनेक कारणे असतात मात्र पालघरच्या डहाणू येथे घडलेल्या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मुलाच्या कुटुंबियांनी दोघाच्या लग्नाला नकार दिल्याने दोघांनाही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे डहाणूमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलीच्या अपंगत्वामुळे मुलाच्या कुटुंबियांनी दोघांच्या लग्नाला नकार दिला आणि त्यामुळेच दोघांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे समोर आले.

पालघरच्या डहाणू तालुक्यातील वंकास येथे राहणाऱ्या दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या दोघांचेही वय १८ ते १९ वर्षे इतके होते. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे एकमेकांवर जिवापड प्रेम होते. दोघांनी एकमेकांशी लग्न करायची तयारीही दाखवली होती. दोघांनीही त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रेमाची माहिती दिली. मुलाच्या कुटुंबियांना मात्र हे लग्न मान्य नव्हते. त्यांनी दोघांच्याही लग्नाला नकार दिला. त्यामुळे दोघांनीही गांगनगाव येथील बारडच्या डोंगरावर जाऊन दोघांनीही गळफास लावून आत्महत्या केली.

- Advertisement -

दोघांच्याही कुटुंबियांना ही माहिती कळताच दोघांनाही मोठा धक्का बसला. प्रेमी युगुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी डहाणू येथील कॉटेज रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. प्रेमी युगुलांना मुलाच्या घरच्यांनी लग्न करण्यास नकार दिला म्हणून त्यांनी आपली जिवनयात्रा संपवली असे निगर्शनास आले. मुलीचा हात एका अपघातात जळला होता.


हेही वाचा – पत्नीच्या ‘या’ व्यसनामुळे मागितला पतीने घटस्फोट

- Advertisement -