घरक्राइमब्रेकअप केल्याच्या विरहात प्रियकराने केलं असं काही...

ब्रेकअप केल्याच्या विरहात प्रियकराने केलं असं काही…

Subscribe

मुलीच्या आईकडून या दोघांच्या प्रेम प्रकरणाला विरोध

प्रेम प्रकरणातून होणाऱ्या हत्या आणि मारामारीच्या घटना देशात वाढल्या आहेत. अशीच एक घटना कर्नाटकात उघडकीस आली आहे. प्रेयसीने ब्रेकअप केल्याने प्रियकर चांगलाच भडकला आहे. रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीची स्कुटीलाच आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीने ब्रेकअप केल्याने प्रियकराला राग आला होता. राग अनावर झाल्याने प्रेयसीला जीवे मारण्याची धमकी प्रियकराने दिली होती. ही घटना बंगळुरुमध्ये घडली आहे. नाराज प्रियकराला प्रेयसीचा राग आला होता. त्यामुळे रागात प्रेयसीला अद्दल घडवण्यासाठी प्रियकराने तिची स्कुटीच जाळली आहे. या प्रेयसीने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासात सदर घटना उघडकीस आली आहे.

या प्रेमी युगलाचे एकमेकांवर प्रेम होते. प्रेम प्रकरण सुरु होऊन काही महिने उलटल्यावर मुलीच्या आईला या बाबत समजले. मुलीच्या आईकडून या दोघांच्या प्रेम प्रकरणाला विरोध होता. त्यामुळे मुलीने ब्रेकअप केला होता. परंतु आरोपी प्रियकराला राग आल्याने त्याने प्रेयसीला जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तिच्या आईचाही जीव घेईल अशी धमकी दिली होती. परंतु त्याने प्रेयसीच्या दुचाकीलाच आग लावली.

- Advertisement -

प्रियकराने २ जानेवारीला स्कुटीवर पेट्रोल टाकून पेटवल्याचे प्रेयसीने दाखल केलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे. मुलीने आपली गाडी घराबाहेर उभी केली होती. तरुणीने पोलिसांना अशीही माहिती दिली आहे की, ब्रेकअप केल्यानंतर प्रियकराने मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -