घरक्राइमBulli Bai | बुल्ली बाई अॅप निर्मितीमागे नेपाळी नागरिकाचा हात

Bulli Bai | बुल्ली बाई अॅप निर्मितीमागे नेपाळी नागरिकाचा हात

Subscribe

बुल्ली बाई अॅप प्रकरणी आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली आहे.

बुल्ली बाई अॅपवरून मुस्लिम महिलांची आणि महिला पत्रकारांची बदनामी केल्याचे प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापलेय. या प्रकरणी आत्तापर्यंत श्वेता अनंत सिंह, मयंक प्रदीपसिंह रावत आणि विशाल कुमार झा या तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. दरम्यान मुंबई सायबर सेलला यासंबंधी अटक आरोपी विशाल कुमार झा याचे कोणतेही आर्थिक व्यवहार आढळून आलेले नाहीत. मात्र यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय असून त्यासाठी अटक करण्यात आलेल्या या तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करणार आहे.

आरोपी श्वेता सिंह ही नेपाळमधील एका सोशल मीडिया मित्राच्या सूचनेनुसार हे काम करत असल्याचेही पोलिसांना आढळून आले आहे. सूत्रांनी सांगितले की, सिंहकडून मिळालेल्या माहितीनुसार, गियू नावाचा नेपाळी नागरिक तिला अॅपबद्दल सूचना देत होता.

- Advertisement -

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, “आम्हाला संशय आहे की आरोपींना या कामासाठी आर्थिक मदत दिली जात होती. दरम्यान @Giyu44 नावाच्या ट्विटरवरील खातेधारकाने ट्विट केले आहे की, तो बुल्ली बाई अॅपचा निर्माता आहे. आणि ज्यांना यामध्ये अटक करण्यात आली आहे ते या प्रकरणात निर्दोष आहेत आणि त्याचा काहीही संबंध नाही. मुंबई सायबर सेलने आरोपी झा याला अटक केल्यावर राज्याचे गृहमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी याबाबत ट्विट केले. बुधवारी पाटील यांचे ट्विट रिट्विट करत @Giyu44 यांनी स्वतःला अॅपचा निर्माता म्हणून म्हटले आहे.

@giyu44 याने ट्विटमध्ये पोलिसांना आरोपीला अॅपचा युनिक आयडी विचारण्यास सांगितले आहे, कारण हा युनिक आयडी केवळ अॅपचा निर्मात्याकडेच आहे, तो युनिक आयडी अटक आरोपीकडे मिळणार नाही असा देखील दावा या नेपाळी नागरिक असलेल्या तरुणाने केला आहे.

- Advertisement -

बुल्ली बाई अॅप प्रकरणी आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. यातली पहिली अटक बेंगळुरूमधून विशाल कुमार झा या तरुणाची झाली. तर उत्तराखंडमधून श्वेता सिंह नावाच्या तरुणीला अटक करण्यात आली. याशिवाय मुंबई पोलिसांनी मयंक प्रदीपसिंह रावत यालाही अटक केली केली. हे तीनही आरोरी एकमेकांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. तसेच या तिनही आरोपींचे वय १८ ते २१ वर्षाच्या दरम्यान आहे.


PM मोदींच्या सुरक्षेतील चुकीचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात, CM चन्नींकडूनही चौकशी समिती गठीत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -