घरक्राइमChalisgaon Firing Case : 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; भाजपाच्या बाळासाहेब मोरेंची प्रकृती...

Chalisgaon Firing Case : 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; भाजपाच्या बाळासाहेब मोरेंची प्रकृती चिंताजनक!

Subscribe

चाळीसगाव : भाजपाचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्यावर कारमधून आलेल्या पाच जणांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (7 फेब्रुवारी) संध्याकाळी घडली होती. या हल्ल्ल्यात बाळासाहेब मोरे हे गंभीर जखमी होते. त्यामुळे त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी आता 7 जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Chalisgaon Firing Case Case registered against 7 persons BJP Balasaheb More condition is alarming)

हेही वाचा – Baba Siddique : झिशान सिद्दीकी काँग्रेसला रामराम करणार? बाबा सिद्दीकेंचे सूचक वक्तव्य

- Advertisement -

चाळीसगाव शहरातील भाजपाचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे हे रेल्वे स्थानकाजवळील हनुमानवाडीतील कार्यालयात उपस्थित होते. हनुमानवाडी याठिकाणी संध्याकाळी पाचच्या सुमारास कारमधून आलेल्या पाच जणांनी त्याच्या कार्यालयाजवळ गाडी थांबवली आणि आत प्रवेश करत समोर बसलेल्या बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी मोरे यांच्यावर 8 गोळ्या झाडल्यानंतर ते गाडीत बसून फरार झाले. याप्रकरणी आता 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे (31 वर्षे, धंदा मजुरी, रा. लक्ष्मी नगर, बसस्टॅन्डच्या पाठीमागे, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून उददेश उर्फ गुडडू शिंदे (रा. हिरापुर), सचिन गायकवाड (रा. चाळीसगाव), अनिस शेख उर्फ नव्वा शरीफ शेख (रा. हुडको कॉलनी, चाळीसगाव), सॅम चव्हाण (रा. हिरापुर), भुपेश सोनवणे (रा. चाळीसगाव), सुमित भोसले (रा. चाळीसगाव), संतोष निकुंभ उर्फ संता पहेलवान (रा. हिरापुर) यांच्याविरुद्ध गु. रं. नं 56/2024 भादवि कलम 307, 120 (व), 143, 144, 147, 148, 149 सह शस्त्रअधिनियम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील पहिल्या पाच संशयितांनी गोळीबार केला, तर सुमित भोसले आणि संतोष निकुंभ हे देखील या कटात सहभागी होते, असे अजय बैसाणे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : तंत्रज्ञानामध्ये लोकांचं आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता; सरकारचा गुगलसोबत सामंजस्य करार

बाळासाहेब मोरे यांच्यावर पुर्ववैमनस्यातून हल्ला?

हल्लेखोरांनी बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे त्यांच्या पायाला दोन, दंडाला एक आणि एक गोळी छातीला लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. बाळासाहेब मोरे यांना वाचविण्यासाठी अजय बैसाणे गेले असता त्यांच्यावर देखील हल्लेखोरांनी गोळीबार करत परीसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी हल्लेखोर शेवरलेट बिट्स कंपनीच्या कारमध्ये बसून नारावणवाडी पेट्रोलपंपाच्या दिशेने पळून गेले होते. दरम्यान, बाळासाहेब मोरे यांच्यावर पुर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -