Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeक्राइमChhatrapati Sambhaji Nagar : आधी प्रेम मग हत्या; छत्रपती संभाजीनगरातील घडली धक्कादायक घटना

Chhatrapati Sambhaji Nagar : आधी प्रेम मग हत्या; छत्रपती संभाजीनगरातील घडली धक्कादायक घटना

Subscribe

एका प्रियकराने आपल्या प्रेयसील शेतात नेऊन तिची हत्या करत मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरा येथे घडली आहे. मोनिका सुमित निर्मळ असे हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव असून, शेख इरफान शेख पाशा असे हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे.

छत्रपती संभाजीनगर : एका प्रियकराने आपल्या प्रेयसील शेतात नेऊन तिची हत्या करत मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरा येथे घडली आहे. मोनिका सुमित निर्मळ असे हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव असून, शेख इरफान शेख पाशा असे हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच, घटनेचा अधिक तपास करत आहेत. (chhatrapati sambhaji nagar crime news boyfriend killed girlfriend)

नेमकं प्रकरण काय?

जालना येथे राहणारी मोनिका निर्मळ ही छत्रपती संभाजीनगर येथे ये-जा करत असे. छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकावर मोनिका ही तिची दुचाकी पार्क करायची. त्यावेळी तिथे पार्किगवर काम करत असलेल्या शेख इरफान शेख पाशा याच्यासोबत तिची मैत्री झाली. त्यानंतर दोघांचे एकमेकांसोबत वर्षभरापासून संबंध जोडले होते. मात्र, 6 फेब्रुवारी रोजी मोनिका ही नियमीत रेल्वे स्थानकाजवळ गेली असता, तिथे अशलेल्या इरफान याने तिला आपल्या शेतात नेलं आणि तिची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह शेतातल्या एका पडक्या खोलीत पुरला.

पोलिसांच्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी रोजी मोनिका ही रात्री उशिरापर्यंत घरी आली नाही. त्यामुळे तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखळ केली. तक्रारीनुसार पोलिसांनी तपास केला असता, आरोपी शेखने त्याच्या शेतात नेऊन मोनिकाची हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याचे समोर आले. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नसून याप्रकरणी जालना पोलीस पुढील तपास करीत आहेत. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


हेही वाचा – Fraud : दुप्पट रक्कमेच्या आमिषाने पावणेनऊ लाखांची फसवणूक, दादर येथील घटना