धक्कादायक: आईने पंजाबी ड्रेस घातल्याच्या रागात मुलाची गळफास लावून आत्महत्या

'आई तू ड्रेस का घातला? साडी घाल', असे मुलाने आईला सांगितले. मुलाने आईला सांगूनही साडी नेसली नाही या रागाने मुलाने गळफास लावून आत्महत्या केली.

child commits suicide mother wears punjabi dress in satara nagthane
धक्कादायक: आईने पंजाबी ड्रेस घातल्याच्या रागात मुलाची गळफास लावून आत्महत्या

मुले वयात येताना त्यांचा शारिरीक आणि मानसिक विकास होत असतो. त्याच्या मनात प्रत्येक गोष्टींविषयी एक चित्र तयार होत असते. यावेळी मुलांना समजून घेणे गरजेचे असते. सातारा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा तालुक्यातील नागठाणे येथील बाजारमळा परिसरात एका अल्पवयीन मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. मुलाच्या आत्महत्येमागचे कारण ऐकून सर्वच जण अवाक झाले आहेत. आईने पंजाबी ड्रेस घातला म्हणून मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे नागठाणे बाजारमळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे. ‘आई तू ड्रेस का घातला? साडी घाल’, असे मुलाने आईला सांगितले. मुलाने आईला सांगूनही साडी नेसली नाही या रागाने मुलाने गळफास लावून आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेरु शौकत भोसले असे आत्महत्या करणाऱ्या १६ वर्षांच्या मुलाचे नाव आहे. शेरु नागठाणे येथील बाजारमाळ परिसरात त्याच्या कुटुंबियासोबत राहत होता. मंगळवारी त्याची आई बोरीमशीन घरी काम करत होती. शेरु घरी आला तेव्हा त्याने आईने पंजाबी ड्रेस घातल्याचे दिसले. त्याने आईला तू पंजाबी ड्रेस का घातलास असे विचारले. तू हा ड्रेस का घातलास तू साडी घाल, असे त्याने आईला सांगितले. मात्र आईने शेरुचे ऐकले नाही. याचा राग शेरुला आला. तो रागाच्या भरात घरातून निघून गेला. घराच्या मागे असलेल्या एका झाडाला संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ओढीणी बांधून शेरुने गळफास घेऊन त्याचे आयुष्य संपवले.

आईने शेरु खूप वेळ न दिसल्याने शोधाशोध सुरु केली. शोधत असताना शेरु घरामागे असलेल्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची पोलिसांनी त्वरित माहिती देण्यात आली. पोलिसांच्या तपासादरम्यान आईने पंजाबी ड्रेस घातल्याच्या रागाने शेरुने आत्महत्या केल्याचे समोर आले. समोर आलेले कारण पाहून पोलिसही अवाक झाले. या घटनेचा आणखी खोलात तपास पोलीस करत आहेत.


हेही वाचा – भयंकर! बसमध्ये एक्स गर्लफ्रेंडला ३० हून अधिक वेळा भोसकला चाकू आणि…