घरक्राइमउत्तर प्रदेशात ATS ने हजारो नागरिकांचे धर्मांतरचा केला पर्दाफाश, दोघांना बेड्या

उत्तर प्रदेशात ATS ने हजारो नागरिकांचे धर्मांतरचा केला पर्दाफाश, दोघांना बेड्या

Subscribe

हजारो नागरिकांचे धर्मांतर केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी ATS ने सोमवारी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोन आरोपींना अटक केली आहे. देशात सुरु असलेल्या धर्मांतर रॅकेटमध्ये हे दोघे असल्याचे उत्तर प्रदेशात पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या कारवाईमुळे उत्तरप्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे. दक्षिण दिल्लीतील जामिया नगर भागात राहणारे आरोपी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम धर्मांतर रॅकेटच्या माध्यमातून मूकबधिर मुलं आणि महिलांचे जबरदस्तीने धर्मांतर करुन घेत होते. या धर्मांतर रॅकेटमध्ये या दोघांचा मुख्य सहभाग असून त्यांनी आत्तापर्यंत १ हजारांहून अधिक लोकांचे धर्मांतर केल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे.

यात नोएडातील मुकबधिर शाळेतील मुलांचे धर्मांतर या दोन आरोपींनी केल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता गोमतीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोघात धर्मांतर विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हात इस्लामिक दवाह केंद्राच्या अध्यक्षांची उल्लेख करण्यात आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणावर उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार सांगतात की, या धर्मांतर रॅकेटला विदेशातून पैसा पुरवला जात असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींची चौकशी करत अटक केली आहे. आम्हाला मिळालेल्या महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये परदेशातून पैसे पुरवल्य़ासंदर्भातील कागदपत्रे हाती लागली आहेत असेही कुमार यांनी सांगितले आहे.


वक्तशीरपणात मुंबई विमानतळ देशात अव्वल, पण याचे महत्त्व काय?


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -