कोरोनाग्रस्ताचा मृत्यूमुळेच गुन्ह्याची उकल, कोट्यावधींची फसणूक प्रकरणी ७ जणांना अटक

कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून जगाला निरोप दिलेल्या आरोपीच्या ७ सहकाऱ्यांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली

arrest
प्रातिनिधीक फोटो

कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृत झालेल्या व्यक्तीने शेकडो लोकांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून जगाला निरोप दिलेल्या आरोपीच्या ७ सहकाऱ्यांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली असून त्यात तीन महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी मृत व्यक्तीने फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेली संपत्ती जप्त केली आहे.

असा घडला प्रकार

प्रशांत कांबळी असे मृत्यू झालेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. बदलापूर येथे राहणाऱ्या प्रशांत कांबळी यांनी १० जून रोजी संकल्प फायनान्स नावाची कंपनी सुरु केली होती. या कंपनीचे ठाणे आणि कल्याण या ठिकाणी कार्यालय आहेत. संकल्प फायनान्स ही गरजवंताना वेगवेगळ्या बँकाकडून कर्ज काढून देण्याचे काम करीत होती. “एखाद्याला दोन लाख रुपयांच्या कर्जाची गरज असेल त्या व्यक्तीचे कागदपत्रे घेऊन बँकांकडून दहा लाख रुपयांची कर्ज काढण्यात येत होते, व त्या व्यक्तीला २ लाख रुपये देऊन बाकी आठ लाख रुपये रोलिंग योजनेत गुंतवणूक करून भरघोस परतावा देण्याचे वचन कांबळी गुतवणूकदारांना देत होता आणि त्यातूनच कर्जाचे हप्ते भरले जाईल, असे असेही प्रशांत याने गुतवणूकदारांना सांगितले होते.

गुंतवणूकदारांची पोलीस ठाण्यात धाव

प्रशांत कांबळी यांनी ६ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज विविध बँकांकडून गुतवणूकदारांना काढून दिले होते. त्यापैकी त्यांचा गरजेपुरती रक्कम त्यांना देऊन उर्वरित रक्कम रोलिंग योजनेत गुंतवणुकीच्या नावाखाली स्वतःकडे ठेवत. दरम्यान जुलै महिन्यात प्रशांत कांबळीचा मृत्यू झाला. कोरोना या संसर्ग होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. प्रशांत कांबळी यांच्या मृत्यूनंतर बँकांच्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकांनी कर्जदाराकडे पैशांचा तगादा लावला. बँकेने पैशांचा तगादा लावल्यामुळे संकल्प फायनान्स कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या कर्जदारापैकी ३७ जण एकत्र आले आणि त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगून तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली.

…आणि फसवणुकीचा प्रकार समोर आला

पोलिसांनी गुन्हा दखल करून तपास सुरु केला. गुंतवणूकदाराची रक्कम त्याच्या खात्यावर जमा झाली त्यांना प्रथम ताब्यात घेतले त्यात मृत प्रशांत कांबळे यांची बहीण इतर सहा जण संकल्प फायनान्स कंपनीत नोकरी करणारे कर्मचारी आहेत. हेमलता कांबळी, सुप्रिया गुरव, तन्मय देशमुख, वृषाली पवार, अभिजित गुरव, राहुल काळोजे आणि मितेश कांबळी असे ताब्यात घेतलेल्या सात जणांची नावे असून त्यांच्या चौकशीत हा सर्व फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत प्रशांत कांबळी सह आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तीन महिलांसह सात जणांना अटक केली आहे. प्रशांत कांबळी आणि इतर सात जणांनी फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेली एकूण ३ कोटीची मालमत्ताजप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक फुलपगारे यांनी दिली. प्रशांत कांबळी यांच्या मृत्यूने बॅंकच्या कर्जाचे हप्ते थांबल्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. अन्यथा या फसवणुकीचा प्रकार आद्यपही सुरु असता, अशी माहिती फुलपगारे यांनी दिली.


विवाहितेचा मृत्यू झाला असे समजून माहेरचे अस्वस्थ; पण सापडली प्रियकरासह!