घरक्राइमलोकल समोर युगुलाची आत्महत्या; व्हॉट्स Appवर स्वत:लाच वाहिली श्रद्धांजली

लोकल समोर युगुलाची आत्महत्या; व्हॉट्स Appवर स्वत:लाच वाहिली श्रद्धांजली

Subscribe

अंबरनाथ स्थानकाच्या बी कॅबिन जवळ खांबा क्रमांक 61/1 जवळ धावत्या लोकल समोर आत्महत्या करून त्यांची जीवनयात्रा संपवली. या दोघांनीही आत्महत्या करण्यापूर्वी व्हाट्स अप स्टेटसवर स्वतःला श्रद्धांजली वाहिल्याचे स्टेटस ठेवले होते, असे तपासादरम्यान समोर आले आहे.

प्रेमप्रकरणात नकार दिल्याने आपले जिवन संपवल्याच्या अनेक घटना घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना अंबरनाथमधून समोर येत आहे. धावत्या ट्रेन मधून आत्महत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. घरच्यांनी प्रेमाचा स्वीकार न केल्याने प्रेमी युगुलानी आपले धावत्या लोकल समोर उडी मारून आपले सहजीवन संपवले. या युगुलाने आत्महत्येपूर्वी व्हाट्स Appवर स्वत: श्रद्धांजली वाहिली असल्याची बाब उघडकीस आली आहे.

योगेश बेंडाळे (वय 30) आणि दीप्ती ( 22 ) अशी दोघांची नावे आहेत. दोघेही अंबरनाथच्या खुंटावली परिसरात राहणारे रहिवासी होते.  या दोघांनी अंबरनाथ स्थानकाच्या बी कॅबिन जवळ खांबा क्रमांक 61/1 जवळ धावत्या लोकल समोर आत्महत्या करून त्यांची जीवनयात्रा संपवली. या दोघांनीही आत्महत्या करण्यापूर्वी व्हाट्स अप स्टेटसवर स्वतःला श्रद्धांजली वाहिल्याचे स्टेटस ठेवले होते, असे तपासादरम्यान समोर आले आहे. दोघांच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्याचे व्हॉट्स App स्टेटस पाहून त्यांच्या मित्रमंडळींनाही आधी काही कळाले नाही. मात्र त्यांच्या आत्महत्येचे वृत समजल्यावर मित्रमंडळींनाही मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

योगेश आणि दिप्ती हे अंबरनाथच्या खुंटवली परिसरात राहणारे रहिवासी होते. काही वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली होती. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. योगेश व दिप्ती यांचे कथितरीत्या प्रेमसंबंध होते. परंतु त्यांच्या प्रेमाला दिप्तीच्या कुटुंबियांचा विरोध होता. ते दिप्ती आणि योगेश यांच्या नात्यावर नाराज होते. कुटुंबियांच्या विरोधाला कंटाळून या दोघांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. कल्याण जीआरपी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा – लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरा झाला गायब, वाचा नेमकं काय झालं प्रकरण!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -