Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम चहाच्या एका घोटानं गेला पतीचा जीव; पत्नीच्या एका चुकीने हसतं-खेळतं घर झालं...

चहाच्या एका घोटानं गेला पतीचा जीव; पत्नीच्या एका चुकीने हसतं-खेळतं घर झालं उद्ध्वस्त

Related Story

- Advertisement -

पत्नीच्या एका चुकीने हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झाल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. चहाच्या घोटाने सुखी घर उद्धवस्त झाले आहे. श्रीकिशन सेन आणि कमलाबाई या वृद्ध जोडप्यासाठी सकाळचा एकत्रित घेतलेला चहा त्यांचा शेवटचा चहा असेल याची कोणालाही कल्पनाही नव्हती.

कमलाबाई यांनी नेहमीप्रमाणे आपल्या पतीसाठी चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या. मात्र, चहासाठी चहा पावडर नसल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्या दुसऱ्या खोलीत चहा पावडर आणण्यासाठी गेल्या. डोळ्यांना नीट दिसत नसल्यामुळे त्यांनी चहा पावडर ऐवजी कीटकनाशक उचलले. स्वयंपाक घरात आल्यानंतर त्यांनी उकळत्या पाण्यात कीटकनाशक टाकले. तो चहा झाल्यानंतर त्यांनी पती श्रीकिशन सेन आणि त्यांच्या मुलाला दिला. मुलाने चहा कडू लागल्याने फेकून दिला. चहा प्यायल्यानंतर श्रीकिशन सेन सायकल घेऊन बाहेर निघाले. मात्र, काही अंतर जाताच त्यांना चक्कर आली. श्रीकिशन यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले.

- Advertisement -

दुसरीकडे कमलाबाई यांनीही चहा घेतल्याने त्यांचीही प्रकृती बिघडली. शिवाय, मुलाची देखील परिस्थिती गंभीर झाली. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी थोड्यावेळानं कमलाबाई यांनाही मृत घोषित केले, तर मुलगा जितेंद्रवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -