स्टीलच्या ग्लासमध्ये फोडला फटाका; ९ वर्षीय मुलाच्या उडाल्या चिंधड्या

प्रातिनिधीक फोटो

लहान मुलांना फटाक्यांची फार आवड असते. लहान मुलं जीवाची पर्वा न करता फटाक्यांशी खेळतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण फटाक्याशी खेळताना एकाचा मुलाचा जीव गेला आहे. दिल्लीच्या वायव्य भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.

९ वर्षाच्या मुलाने फटाका स्टीलच्या ग्लासमध्ये ठेवला. फटाका फूटला नाही म्हणून बघायला गेला असता फटाका फूटला. त्यामुळे लहान मुलाचा जीव गेला. प्रिन्स असं या दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. प्रिन्स हा इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता. शुक्रवारी ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीपूरजवळच्या बखताबरपूर इथे घटना घडली आहे. प्रिंस दास आपल्या आई वडिलांसोबत बखताबरपूर इथे एका कॉलनीमध्ये राहत होता. आई–वडील कामावर गेले असताना प्रिन्स आपल्या मित्रांसोबत एका रिकाम्या घरामध्ये खेळत होता. खेळताना गंमत म्हणून जळता फटका स्टीलच्या ग्लासखाली ठेवला. बराच वेळ झाला मात्र, फटका फुटला नाही. म्हणून तो पुन्हा फटाका बघायला गेला आणि अचानक फटाक्याचा स्फोट झाला. फटाक्याच्या स्फोटामुळे स्टीलचा ग्लास फुटला आणि ग्लासचे तुकडे प्रिन्सच्या शरीरात घुसले. त्यात प्रिन्सचा मृत्यू झाला.