Homeक्राइमCrime : नवी मुंबईच्या कामोठेत आढळले मायलेकांचे मृतदेह, पोलिसांना हत्येचा संशय

Crime : नवी मुंबईच्या कामोठेत आढळले मायलेकांचे मृतदेह, पोलिसांना हत्येचा संशय

Subscribe

पनवेल : नवी मुंबईच्या कामोठे नोडमधील सेक्टर-६ मधील एका इमारतीत एका वृद्धेचा आणि तिच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कामोठीतील ड्रीमलँड या अपार्टमेंटमधील ही घटना असून दोघांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील कामोठेमधील ड्रीमलँड या अपार्टमेंटमध्ये गीता जग्गी (70) आणि त्यांचा मुलगा जितेंद्र जग्गी (45) राहात होते. बुधवारी (1 जानेवारी) सायंकाळी जग्गी याच्या फ्लॅटमधून गॅस लीक होत असल्याचे लक्षात आले. ही माहिती शेजाऱ्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. अग्निशमन दल आणि पोलीस सायंकाळी पाचच्या सुमारास ड्रीमलँड अर्पाटमेंटमध्ये पोहोचले. त्यावेळी गीता जग्गी यांचे घर बंद होते आणि आतून कुणीही उघडत नव्हते. अखेर अग्निशमनच्या जवानांनी कटरने दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा गीता जग्गी आणि जितेंद्र जग्गी यांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या बेडरूममध्ये आढळले. पोलिसांना त्यांचे मृतदेह पाहून हत्या झाल्याचा संशय आहे.

हेही वाचा…  Beed Crime : माजी सरपंचाला केली मारहाण, पायाला लावले कुलूप; नेमकं प्रकरण काय?

जितेंद्र जग्गी यांच्या चेहऱ्यावर मारल्याच्या जखमी आढळल्या तर गीता जग्गी यांच्या अंगावर जखमा नाहीत. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. दरम्यान, त्यांच्या हत्येचा संशय आल्याने पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. त्यासाठी पोलिसांनी ड्रीमलँड अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.

(Edited by Avinash Chandane)