घरक्राइमCrime News: माझ्या पतीला संपवणाऱ्याला 50 हजार देणार; पत्नीची थेट Online सुपारी

Crime News: माझ्या पतीला संपवणाऱ्याला 50 हजार देणार; पत्नीची थेट Online सुपारी

Subscribe

आग्रा: सोशल मीडियाचा वापर कोण कसा करेल याचा काही नेम नाही. प्रत्येकजण आपापल्या सोयीने चांगला व वाईट वापर करत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने आपल्या पतीची हत्या करण्यासाठी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून सुपारी दिली. (Crime News I will give 50 thousand to the one who kills my husband Wife s live online betel nut)

उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये पती-पत्नीच्या भांडणांचा विचित्र प्रकार समोर आला. सततच्या होणाऱ्या वादांमुळे माहेरी राहणाऱ्या पत्नीने थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पतीच्या हत्येची सुपारीदेखील दिली.. इतकचं नाही तर व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून पतीची हत्या करणाऱ्याला 50 हजार रुपयांचं बक्षीसदेखील जाहीर केलं आहे. पत्नीचं असं स्टेटस पाहिल्यावर घाबरलेल्या पतीने थेट पोलिसांत धाव घेत, तक्रार दिली आहे.

- Advertisement -

प्रकरण काय?

उत्तर प्रदेशमधील आग्र्यात पत्नीने पतीला ठार करण्यासाठी 50 हजारांची ऑनलाईन सुपारीच दिली आहे. पत्नीचं व्हॉट्सअॅप स्टेटस पाहून पती घाबरला आणि त्याने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मला वेळीच मदत करावी, नाहीतर माझ्या जिवाला धोका आहे, असं त्याने म्हटलं आहे. तसंच पत्नीच्या मित्राविरोधातही धमकावल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 9 जुलै 2022 रोजी त्याचे मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील एका तरुणीशी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांमध्ये मतभेद झाले. त्यामुळे पत्नी भांडली आणि ती त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात तिच्या माहेरी, भिंड येथे गेली. एवढंच नाही तर पत्नीने भिंड न्यायालयात भरणपोषणाचा दावाही दाखल केला. यामुळे पतीला कोर्टाच्या तारखांसाठी भिंडे येथे जावे लागले.

- Advertisement -

21 डिसेंबर 2023 रोजी कोर्टाच्या तारखेवरून परतत असताना सासरच्यांनी त्यांच्याच जावयाला जीवे मारण्याची धमकी दिली. तेवढ्यातच त्या विवाहीत महिलेने आता कालच तिच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर पतीला मारण्यासाठी सुपारी दिली. माझ्या इच्छेविरुद्ध लग्न झाले आहे. जो कोणी माझ्या पतीची हत्या करेल त्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असं पत्नीने तिच्या स्टेटसवर लिहिले होते. पतीने केलेल्या तक्रारीनंतर धमकी आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 च्या कलन 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा: MS Dhoni Record T-20: महेंद्रसिंह धोनीने रचला इतिहास; असा रेकॉर्ड करणारा पहिला यष्टीरक्षक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -