Homeक्राइमCrime news : चोरी करायला गेला अन् भजी खात बसला, कुठे घडली...

Crime news : चोरी करायला गेला अन् भजी खात बसला, कुठे घडली विचित्र घटना?

Subscribe

आंध्र प्रदेशातील कुरनूलमधील नंदालयातील एका घरात चोरी करायला गेलेल्या चोराने घरातील मौल्यवान वस्तू तर पळवल्या, पण सोबतच त्याने घरात मिर्चीची भजी बनवून सुद्धा खाल्ल्याची माहिती समोर आली आहे.

कुरनूल (आंध्र प्रदेश) : देशात चोरीच्या अनेक घटना रोज घडत असतात. काही ठिकाणी चोरी मोठा हात मारत सर्वकाही लंपास करतात, तर काही ठिकाणी चोरांना काहीच न सापडल्याने ते चोरी करायला गेलेल्या ठिकाणाला अत्यावस्था करून पळून जातात. पण हल्लीच्या काळातील चोरांनी नवा फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे. तो नवा फंडा म्हणजे, चोर चोरी करायला तर जातात पण ते तिथे झोपून घेतात किंवा अजून काही तरी विचित्र प्रकार करतात. अशाच एका चोराच्या बाबतीतील विचित्र प्रकार आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये घडला आहे. या चोराची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कुरनूलमधील नंदालयातील एका घरात चोरी करायला गेलेल्या चोराने घरातील मौल्यवान वस्तू तर पळवल्या, पण सोबतच त्याने घरात मिरचीची भजी बनवून सुद्धा खाल्ल्याची माहिती समोर आली आहे. (Crime news In Andhra Pradesh, thief went to steal and ate chilli bhaji)

समोर आलेल्या माहितीनुसार, नंदालयातील मारुती नगर भागातील एका बंद घरात काही चोरट्यांनी प्रवेश केला. सुरुवातीला या चोरांनी घरातील सोन्याचे दागिने, काही रोख रक्कम आणि तीन सिलिंडर चोरून नेले. यानंतर यातील एक चोर किचनमध्ये गेला. तिथे या चोराला शेंगदाणे, लोणी आणि मिरच्या दिसल्या. त्यामुळे भुकेल्या झालेल्या चोरांना यावेळी गरम भजी खावेसे वाटले. त्यानंतर भुकेल्या चोरट्यांनी गॅसची शेगडी पेटवली आणि मिरची भजी बनवली. या भजीवर सर्व चोरट्यांनी ताव मारला. यानंतर या चोरट्यांनी भांडी स्वयंपाकघरात पसरवली आणि पळ काढला. पण या घरातील लोक ज्यावेळी घरी परतले, त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण चोरांनी घरातील मौल्यवान वस्तू तर पसरवल्या होत्या, मात्र घरातील सामान सुद्धा पसरवले होते.

हेही वाचा… Shirdi Double Murder : शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली, संस्थानातील दोन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने खळबळ

घरातील लोकांनी घरात येऊन पाहिले असता स्वयंपाकघरात सामान पसरलेले होते. यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांच्या घरातून सोने, रोख रक्कम आणि सिलिंडर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यासोबतच किचनची अवस्थाही पोलिसांना सांगितली. पोलिसांनी घरमालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पण या चोरट्यांनी केलेली चोरी सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

याआधी सुद्धा मागील वर्षी लखनऊ येथील इंदिरा नगर परिसरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका चोराने एसीच्या हवेत झोपून घेतले होते. या चोराने दारूच्या नशेत घर फोडले. त्यानंतर घरात ठेवलेल्या मौल्यवान वस्तू गोळा केल्या आणि नंतर तिथेच झोपी गेला. सकाळी कुलूप तुटलेले पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस आल्यावर चोर झोपेतून जागा झाला. त्याच क्षणी त्याला अटक करण्यात आली.