खोपोली : ऑर्केस्टाच्या नावाखाली खालापूर तालुक्यातील स्वागत, पूनम आणि समुद्रा बारमध्ये छमछम सुरू होती. अश्लील हावभाव करून नृत्य सुरू होते. ही माहिती मिळताच तिन्ही बारमधील ३२ बारबालांसह ४० जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याने खालापूर तालुक्यासह रायगडमध्ये खळबळ उडाली आहे.
खालापूर तालुक्यातील कलोते गावाच्या हद्दीत असलेल्या स्वागत, पूनम आणि लोधिवली येथे ऑर्केस्टा बारमध्ये मनोरंजनाच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे ३ अधिकारी आणि २२ अंमलदार तसेच ६ महिला अंमलदार आणि बांगलादेशी पथकातील एक पोलीस अधिकारी, एक महिला अंमलदार यांची ३ पथके तयार करण्यात आली.
हेही वाचा… Sharad Pawar : नीलम गोऱ्हेंनी असे भाष्य केले नसते तर, शरद पवारांनी स्पष्टच सांगितले
ही पथके खालापूर पोलीस ठाणे हद्दीतीली समुद्रा, स्वागत आणि पूनम बारकडे रवाना करण्यात आले. तिन्ही पथकांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये तेथील बारबाला संगीताच्या तालावर अश्लील हावभाव करत बिभत्स नृत्य करत होत्या. तसेच आरडाओरडा करुन सार्वजनिक शांततेचा भंग करत असल्याचे आढळून आले. त्यांच्या सोबत बारमधील कर्मचारी व ग्राहक त्यांना अश्लील हावभाव आणि बीभत्स नृत्य करण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे दिसले.
समुद्रा बारमध्ये आरोपी राहुल नरेश यादव यासह २२ (८ बारबाला, ७ ग्राहक, बारमधील ७ कर्मचारी) तसेच स्वागत बार प्रकरणात आरोपी मीरा खातून मुखचंद शंखसह २८ (बारबाला १२, ग्राहक १०, बारमधील कर्मचारी ६) आणि पूनम बारमधील तोश मंजीवा मोगविरासह २२ (बारबाला १२, ग्राहक ७, बारमधील कर्मचारी ३) अशा एकूण ७२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
(Edited by Avinash Chandane)