वर्ध्यात गोबर गॅसच्या टाकीत आढळल्या अर्भकांच्या 11 कवट्या अन् 54 हाडं ; पोलीस अधीक्षकांची माहिती

या प्रकरणासंदर्भात आज वर्धाचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर पत्रकार परिषद घेतली. यावेळी संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.

crime news wardha child abortion news remains of aborted infants found in kadam hospital premises
वर्ध्यात गोबर गॅसच्या टाकीत आढळल्या अर्भकांच्या 11 कवट्या अन् 54 हाडं ; पोलीस अधीक्षकांची माहिती

वर्धा जिल्ह्यातील आर्वीमधील कदम रुग्णालयात १३ वर्षीय मुलीच्या अवैध्य गर्भपाताप्रकरणी कारवाई सुरु होती. या कारवाईदरम्यान रुग्णालयातील एक अत्यंत धक्कादायक, घृणास्पद प्रकार समोर आला आहे. कदम रुग्णालय परिसरातील एका गोबर गॅस टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडले आहेत. या रुग्णालयाच्या संचालिका डॉ. रेखा कदम यांना पोलिसांनी गर्भपात प्रकरणी आधीच बेड्या ठोकल्या आहेत. याच प्रकरणाच्या चौकशीदरम्यान गोबर गॅस टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमणात अर्भकांचे अवशेष सापडल्याने आता हे प्रकरण अधिकचं गंभीर बनले आहे.

या प्रकरणासंदर्भात आज वर्धाचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर पत्रकार परिषद घेतली. यावेळी संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सांगितले की, वर्धा गर्भपात अर्भक अवशेष प्रकरणी आरोपी डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले असून त्याचा पीसीआर घेण्यात आला आहे. ज्यामध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

या आरोपी डॉक्टराच्या रुग्णालयात सोनोग्राफी मशीन सापडली आहे. संबंधीत डॉक्टराच्या सासूबाई स्वत: एक महिला बालरोग तज्ज्ञ आहेत. दरम्यान त्यांना अटक झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असतानाच 12 जानेवारीला खबऱ्यांकडून माहिती मिळाली की, आरोपी डॉक्टरांच्या घरामागील घरगुती गोबर गॅसच्या प्लंटमध्ये कोणतेही कायदेशीर नियम न पाळता अर्भकांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली होती. त्यानुसार खोदकाम केले असताना अर्भकांचे अवशेष सापडले आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. हेमंत पाटील यांना बोलवून हे अवशेष जप्त केले. गोबर गॅसच्या टाकीत 11 कवट्या आणि 54 हाडं सापडली आहेत. गर्भपातची नोंद असलेले रजिस्टर जप्त केले आहे. तसेच किती जण या रुग्णालयात मेडिकल चेकिंगसाठी आलेले याचेही रजिस्ट्रर जप्त केले आहे.

मात्र गर्भपात करण्यात आलेल्या रजिस्टरमध्ये फक्त 8 चं लोकांची नावं रजिस्टर आहे. त्यामुळे बाकी 3 कवट्या कोणाच्या आहेत. याचा तपास सुरु आहे, यात गर्भक नष्ट करण्याची पद्धत चुकीची होती.

नेमकं प्रकरण काय आहे?

वर्धा जिल्ह्यातील आर्वीतील एक 13 वर्षीय मुलगी 17 वर्षीय मुलासोबतच्या शारीरिक संबंधांतून गर्भवती झाली होती. दरम्यान या प्रकरणातील आरोपी मुलाच्या आई- वडिलांनी गर्भवती मुलीच्या आई -वडिलांना अवैध गर्भपातसाठी दबाव टाकत तिचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मुलाच्या आई -वडिलांनी वर्ध्यातील कदम रुग्णालयातील डॉ. रेखा कदम यांना पैसे दिले. याप्रमाणे डॉ. रेखा यांनी 4 जानेवारीला संबंधीत गर्भवती मुलीला कदम रुग्णालयात दाखल करुन घेतले आणि 6 जानेवारीला तिचा गर्भपात केला. गर्भपात करत रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मदतीने अर्भक कदम रुग्णालयाच्या इमारतीमागील गोबर गॅस टाकीत टाकून देण्यात आले.

गोपनीय सूत्रांकडून ही माहिती वर्धा पोलिसांपर्यंत पोहचली. यानंतर 10 जानेवारीला पोलिसांनी डॉ. रेखा कदम यांना अटक केली. त्यानंतर रुग्णालयातील परिचारिका संगीता काळे यांनाही अटक करण्यात आली. दरम्यान या दोघांची चौकशी सुरु असताना काल पोलिसांनी कदम रुग्णालयाच्या पाठीमागील गोबर गॅसची टाकी उघडली. तेव्हा त्यातून अर्भकाच्या 11 कवट्या आणि 54 हाडं सापडली आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना घटनास्थळी पाचारण केले. सध्या अर्भकांच्या कवट्या आणि हाड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. हेमंत पाटील यांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.


भारतीय टोपीची अमेरिकेत क्रेझ, एका टोपीसाठी मोजले जातात 2200 रुपये