Homeक्राइमCrimes in Beed : बीडमधील गुन्ह्यांचा आलेख चढताच, अवघ्या 10 महिन्यांत 36...

Crimes in Beed : बीडमधील गुन्ह्यांचा आलेख चढताच, अवघ्या 10 महिन्यांत 36 खून अन् 156 अत्याचार

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या काळात धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाच बीडमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढल्याची नोंद झाली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या दहा महिन्यांत बीड जिल्ह्यात 36 खून नोंदवले गेले आहेत.

(Crimes in Beed) मुंबई : सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून वातावरण तापले आहे. बीड जिल्ह्याचा बिहार झाला आहे का? असा प्रश्न विरोधकांनी केला आहे. तर, बीड जिल्ह्याला इतकेही बदनाम करू नये, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. असे असले तरी, बीडमधील गुन्ह्याचा आलेख चढताच असल्याचे समोर आले आहे. अवघ्या 10 महिन्यांत 36 खून आणि 156 अत्याचारांची नोंद येथे झाली आहे. (36 murders reported in Beed in last 10 months)

केज तालुक्यातील अवादा एनर्जी कंपनीचे काम सुरू ठेवण्यासाठी हात-पाय तोडण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे आरोपी आहेत. याचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड असून तो मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती मानला जातो. त्यामुळे यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनाही भाजपासह विरोधकांनी लक्ष्य केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – SS UBT on ECI : लोकशाहीची म्हैस मोदी-शहांचीच, असे का म्हणाला ठाकरे गट?

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या काळात धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाच बीडमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढल्याची नोंद झाली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या दहा महिन्यांत बीड जिल्ह्यात 36 खून नोंदवले गेले आहेत. यात परळीतील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या हत्येचाही समावेश आहे. तसेच खूनाच्या प्रयत्न केल्याचे 168 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

जमावाने मारामारी करणे, दंगल घडवणे यासारखे 498 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 7 गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. या जिल्ह्यात महिला असुरक्षित असल्याचेही दिसत आहे. जिल्ह्यात अत्याचाराचे 156 तर, विनयभंगांचे 386 गुन्हे नोंदवण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, छेडछाडीच्या 386 घटनाही घडल्या आहेत.

फडणवीसांची कबुली

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना अतिशय गंभीर असल्याची कबुली देतानाच, तेथील गुन्हेगारांना आम्ही जरब बसवूच. तिथे कोणाचीही दादागिरी चालून देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे, या जिल्ह्याची तुलना बिहारमधील गुन्हेगारीशी केली जात आहे. हे योग्य नाही. या जिल्ह्याला एवढे बदनाम करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (Crimes in Beed: 36 murders reported in Beed in last 10 months)

हेही वाचा – Kalyan Kidnapped Case : सर्व गुंड कल्याण, अंबरनाथ, बीडमध्येच का असतात? राऊतांचा सरकारला सवाल


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -