Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeक्राइमDelhi Crime : राजधानीत विदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

Delhi Crime : राजधानीत विदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

Subscribe

दुसऱ्या दिवशी सकाळी ती तरुणी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये गेलीआणि तिने तिथे वेद्यकीय तपासणी करून घेतली. हॉस्पिटल प्रशासनाकडून पोलिसांना ही माहिती देण्यात आली.

(Delhi Crime) नवी दिल्ली : दिल्लीतील महिपालपूरमध्ये एका विदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, ही तरुणी ब्रिटिश नागरिक असून सोशल मीडियाद्वारे तिची एकाशी मैत्री झाली. त्याला भेटायला ती दिल्लीत आली होती. (Two arrested in rape case of foreign girl)

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कैलाश नावाच्या तरुणाशी मैत्री केली होती. भारतात आल्यावर या तरुणीने त्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावले होते. तेव्हा कैलाश आणि त्याच्याबरोबर आलेल्या मित्राने तिच्याशी गैरवर्तन केले. वसंत कुंज (उत्तर) पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आहे. तसेच, दिल्ली पोलिसांनी या घटनेची माहिती ब्रिटिश उच्चायुक्तालयाला दिली आहे.

हेही वाचा – Beed Crime : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस अधीकक्षकांनी घेतला हा निर्णय; अधीक्षकांपासून शिपायापर्यंत सर्वांना लागू

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पूर्व दिल्लीच्या मयूर विहार परिसरात वसुंधरा येथे राहतो. रील्स बनवून इंस्टाग्रामवर पोस्ट करण्याचाचा त्याचा छंद आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची इन्स्टाग्रामद्वारे लंडनमध्ये राहणाऱ्या एका मुलीशी मैत्री झाली. काही दिवसांपूर्वी ही मुलगी महाराष्ट्र आणि गोवा येथे फिरायला आली होती. तिथून तिने कैलासला फोन करून भेटायला बोलावले. पण कैलासने तिथे जाण्यास असमर्थता दर्शविली आणि तिलाच दिल्लीला येण्यास सांगितले. ती मंगळवारी संध्याकाळी दिल्लीत आली आणि महिपालपूरमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास थांबली.

तिने बोलावल्यावर कैलास हा आपला मित्र वसीमसोबत हॉटेलमध्ये पोहोचला. तिथे दारू ते दारू प्यायले आणि एकत्र जेवण केले. त्यानंतर, गप्पा मारता मारता ते हॉटेलच्या खोलीत गेले आणि कैलासने तिच्याशी अतिप्रसंग केला. या घटनेनंतर मुलीने आरडाओरड केली. कैलासने वसीमला खोलीत बोलावले आणि तिला समजावून शांत करायला सांगितले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ती तरुणी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये गेलीआणि तिने तिथे वेद्यकीय तपासणी करून घेतली. हॉस्पिटल प्रशासनाकडून पोलिसांना ही माहिती देण्यात आली. त्यानंतर दुपारी वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्याने कैलास आणि वसीमला अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर करून रिमांडवर घेण्यात आले.

हेही वाचा – Aditi Tatkare : रायगडमध्ये शालेय पोषण आहारात सापडला मृत उंदीर, स्वतंत्र समितीमार्फत चौकशी