नवी दिल्ली : पूर्व दिल्लीतील गाजीपूर भागात सुटकेसमध्ये सापडलेल्या तरुणीच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. दिल्ली पोलिसांनी अवघ्या काही तासांत या प्रकरणातील दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात वापरलेली कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे. या हत्येतील मुख्य आरोपी हा मृत तरुणीचा नात्याने भाऊ असून, तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. (Delhi Crime: Two arrested in the murder of a young woman)
शनिवारी, 25 जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर पोलीस कंट्रोल रूममध्ये एक कॉल आला होता. गाजीपूर आयएफसी पेपर मार्केटजवळील शिवाजी रोडच्या (खोडा रोड) कडेला एका सुटकेसमध्ये मृतदेह पडल्याची माहिती फोनवरून देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन, तपास सुरू केला. सुटकेसमधील ज्या तरुणीचा मृतदेह आढळला होता, तिचे वय 20 ते 35 वयोगटातील होता. तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवून जाळाला होता, त्यामुळे सुटकेसही बरीचशी जळाली होती, अशी माहिती डीसीपी (पूर्व जिल्हा) अभिषेक धानिया यांनी दिली.
हेही वाचा – Sanjay Raut : भाजपा नायडू आणि नितीश कुमारांचाही पक्ष फोडेल, राऊतांच्या दाव्याने खळबळ
घटनास्थळी गुन्हे अन्वेषण तसेच फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. तर, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी एलबीएस रुग्णालयात पाठवण्यात आला. दिल्लीतील गाजीपूर पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 103(1) / 238 / 3(5) अंतर्गत एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या आधारे या गुन्ह्यात वापरलेल्या टॅक्सीचा शोध घेण्यात आला. यानंतर, त्या गाडीच्या मालकाची सर्व माहिती काढण्यात आली. पोलीस पथकांनी दोन आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली.
आरोपीचे नाव अमित तिवारी असून, 22 वर्षीय अमित गाझियाबादमधील खोडा कॉलनीचा रहिवासी आहे. इयत्ता बारावीपर्यंत शिकलेला अमित टॅक्सी ड्रायव्हर आहे. दुसऱ्या आरोपीचे नाव अनुज कुमार ऊर्फ भोला आहे. गाझियाबादच्या खोडा कॉलनीतील करण विहार येथे राहणारा 20 वर्षीय भोला आठवीपर्यंत शिकला आहे. तो वेल्डिंग मेकॅनिक आहे.
पोलिस चौकशीदरम्यान, अमित तिवारी हा मृत तरुणी शिल्पा पांडे (22) हिचा नात्याने भाऊ असल्याचे असल्याचे उघड झाले आणि तो उत्तर प्रदेशातील खोडा कॉलनीमध्ये साधारणपणे वर्षभरापासून तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. ती अमितवर त्याचे कुटुंब सोडून कायमचे तिच्यासोबत राहण्यासाठी दबाव आणत होती. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची ती धमकी देत होती, असे त्याने पोलिसांना सांगितले. (Delhi Crime: Two arrested in the murder of a young woman)
हेही वाचा – Maha Kumbh 2025 : अंतराळातून महाकुंभ मेळा कसा दिसतो? नासाने शेअर केले फोटो